घरअर्थजगतमंदीची चाहूल! अॅमेझॉनसुद्धा करणार सर्वात मोठी नोकर कपात

मंदीची चाहूल! अॅमेझॉनसुद्धा करणार सर्वात मोठी नोकर कपात

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अनेक टेक कंपन्यांनी नोकर कपातीला सुरुवात केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेताच ट्विटरमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली होती. त्यानंतर, फेसबूकची मातृ कंपनी मेटानेही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यातच, आता अॅमेझॉननेही नोकर कपातीचा निर्णय घेतल्याने जागतिक मंदीची चाहूल लागली असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – जगावर सध्या आर्थिक मंदीचं संकट (Recession) आहे. या संकटात सर्वाधिक फटका रोजगारावर बसणार आहे. मेटाने ११ हजार कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर आता अॅमेझॉनमध्येही (Amazon) १० हजार नोकर कपात होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने नोकर कपातीचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. (Amazon will also make the biggest job cuts)

हेही वाचा – फेसबुकच्या मूळ कंपनीत मोठी कर्मचारी कपात; कमाईतील तूट भरून काढण्यासाठी निर्णय

- Advertisement -

जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनकडून (E-Commerce Company Amazon) सर्वांत मोठी नोकर कपात करण्यात येणार आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात नवी नोकर भरती थांबवण्यात आली. तर, ऑक्टोबरपासून रिटेल व्यवसायात १० हजारांहून जास्त पदांसाठी नोकरभरती थांबवली. तसंच, दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी क्लाऊड कंम्युटिंग डिव्हिजनसहीत कंपनीत कॉर्पोरेट हायरिंगवरही निर्बंध आणले आहेत.

न्यूयॉर्क टाइमच्या अहवालानुसार, अॅमेझॉनमध्ये कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची (Corporate Workers) संख्या तीन टक्के आहे. तर, एकूण १५ लाख कर्मचारी तिथे काम करतात. अॅमेझॉनमध्ये होत असलेली नोकर कपात डिवाइस ऑर्गेनायजेशनमध्ये (Device organisation) होणार आहे. यामुळे वॉइस असिस्टंट एलेक्सा (Voice Assistant Alexa), रिटेल डिव्हिजिन (Retail Divisoin) आणि ह्युमन रिसॉर्सेस (Human Resources) यांचा समावेश असेल.

- Advertisement -

हेही वाचा – Forbesच्या उत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचा समावेश

गेल्या काही दिवसांपासून अनेक टेक कंपन्यांनी नोकर कपातीला सुरुवात केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेताच ट्विटरमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली होती. त्यानंतर, फेसबूकची मातृ कंपनी मेटानेही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यातच, आता अॅमेझॉननेही नोकर कपातीचा निर्णय घेतल्याने जागतिक मंदीची चाहूल लागली असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की त्यांनी कमावलेले १२४ बिलिअन अमेरिकन डॉलर त्यांना दान करायचे आहेत. एकीकडे पैसे दान करण्याची योजना आखली जात असताना दुसरीकडे कंपनी तोट्यात असल्याचं कारण देत कर्मचारी कपात करण्यात येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अॅमेझॉनने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ८० हजार लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. यामध्ये बहुतेक कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करत होते. कोविड काळात सर्व कंपन्या ठप्प झाल्या होत्या. व्यवहार झाले नसल्याने अनेक कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मात्र, याच काळात अॅमेझॉनने सर्वाधिक उत्पन्न कमावलं होतं. असं असतानाही गेल्या दोन दशकातील सर्वांत कमी तोटा याच काळात झाल्याचं समोर आलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -