घरदेश-विदेशआत्ममग्न सरकार देशाच्या गौरवशाली कामगिरीला तुच्छ लेखण्यात व्यस्त, सोनिया गांधींचा घणाघात

आत्ममग्न सरकार देशाच्या गौरवशाली कामगिरीला तुच्छ लेखण्यात व्यस्त, सोनिया गांधींचा घणाघात

Subscribe

आजचे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान बलिदानाला आणि त्यांच्या देदीप्यमान कामगिरीला तुच्छ लेखण्यात गुंतलेले आहेत, असंही टीकास्त्र सोनिया गांधींनी सोडलं आहे

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. या 75 वर्षांत देशाने अनेक शिखर गाठले, यश संपादन केले, पण आजचे ‘आत्ममग्न सरकार’ हे देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि गौरवशाली कामगिरी केलेल्यांच्या योगदानाला क्षुल्लक ठरवण्यात गुंतलेले आहे.

“स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा. गेल्या 75 वर्षात भारताने आपल्या कर्तृत्ववान भारतीयांच्या कठोर परिश्रमातून विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान यासह सर्व क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय पटलावर अमीट छाप सोडली आहे, असंही एका निवेदनात त्या म्हणाल्यात.

- Advertisement -

“भारताने लोकशाही आणि घटनात्मक संस्थांना बळकट करताना आपल्या दूरदर्शी नेत्यांच्या नेतृत्वाखाली एक मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली स्थापन केली पाहिजे. यासोबतच भाषा-धर्म-पंथाच्या बहुलतावादी कसोटीवर सदैव जगणारा आघाडीचा देश म्हणून भारताने आपली अभिमानास्पद ओळख निर्माण केलीय. परंतु आजचे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान बलिदानाला आणि त्यांच्या देदीप्यमान कामगिरीला तुच्छ लेखण्यात गुंतलेले आहेत, असंही टीकास्त्र सोनिया गांधींनी सोडलं आहे.

- Advertisement -

कॉंग्रेस अध्यक्षा म्हणाल्या, “भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक तथ्यांवरील कोणत्याही चुकीच्या विधानाला आणि गांधी-नेहरू-पटेल-आझादजी यांसारख्या महान राष्ट्रीय नेत्यांना खोट्याच्या आधारावर कचेरीत उभे करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला जोरदार विरोध करेल.” माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचाः धक्कादायक! औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -