घरदेश-विदेशधक्कादायक! वडिलांनी ५ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीतून घरी नेला; जाणून घ्या घटना

धक्कादायक! वडिलांनी ५ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीतून घरी नेला; जाणून घ्या घटना

Subscribe

वडिलांना आपल्या ५ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन २०० किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे

मुंबई | पश्चिम बंगालच्या (West Bengal) सिलीगुडीमध्ये एका वडिलांना आपल्या ५ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन २०० किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादयक घटनेनंतर पश्चिम बंगालमधील राजकारण तापले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ( CM Mamata Banerjee) भाजपच्या (BJP) ‘स्वास्थ्य साथी’ (Swasthya Sathi Yojana) योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या मुलाच्या वडिलाचे नाव आशिम देबशर्मा असे आहे. आशिम देबशर्मा म्हणाले, “सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्यांच्या ५ महिन्यांच्या मुलांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्या ५ महिन्यांच्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारासाठी त्यांचे १६ हजार रुपये खर्च झाले. आशिम देबशर्मांनी त्यांच्या मुलाचा मतृदेह कालियागंज येथे त्यांच्या घरी नेण्यासाठी रुग्वाहिका चालकाला विनंती केली होती. परंतु, या रुग्नवाहिका चालकाने त्यांच्याकडे ८ हजार रुपयांची मागणी केली. एवढे पैसे आशिम यांच्याकडे नव्हते.

- Advertisement -

१०२ या योजने अंतर्गत चालण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाने आशिम यांना सांगितले की, रुग्णांसाठी ही सुविधा मोफत आहे. परंतु, मृतदेह नेण्यासाठी कोणताही नियम नाही. आपल्या ५ महिन्याचा मुलाचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकाला ८ हजार रुपये त्यांच्याकडे नव्हते. यामुळे आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत ठेवून बसमधून कालियागंजला नेहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आशिम यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडीपासून उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालिजागंपर्यंत २०० किलोमीटर असे अंतराचा बसने प्रवास केला. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवासांनाही याबद्दल कळाले नाही. जर बस मधील प्रवाशांना हा संपूर्ण प्रकार कळला असता तर ते त्या बसूमधून उतरतील, अशी भीतीही आशिमला होती, अशी माहिती त्यांनी एका हिंदी वेबसाईटला दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -