Wednesday, April 24, 2024
घरमानिनीReligiousइंडोनेशियातील 600 वर्ष जुन्या रहस्यमय मंदिराचे विषारी नाग करतो रक्षण

इंडोनेशियातील 600 वर्ष जुन्या रहस्यमय मंदिराचे विषारी नाग करतो रक्षण

Subscribe

जगभरात अशी अनेक हिंदू मंदिरं आहेत जी वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा रहस्यांमुळे प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळातील या रहस्यमय मंदिरांचे अस्तित्त्व आजही तसेच टिकून आहे. असेच एक हिंदू मंदिर इंडोनेशियामध्ये समुद्राच्या मध्यभागी आहे. या मंदिराचे नाव तनाह लोट मंदिर असून या मंदिराचे संरक्षण एक विषारी साप करतो. खरं तर, भारतामध्ये देखील अशी अनेक रहस्यमय मंदिरं आहेत मात्र, भारताबाहेरील इंडोनेशिया देशामधील या मंदिराचे रहस्य आणि कथा खूपच रंजक आहे.

इंडोनेशियातील बालीमध्ये समुद्राच्या मध्यभागी असलेले हे तनाह लोट मंदिर खडकापासून तयार करण्यात आले आहे. स्थानिक भाषेत ‘तनाह लोट’ या शब्दाचा अर्थ समुद्राची भूमी असा आहे. हे मंदिर जवळपास 600 वर्ष जुने आहे. या मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात. या मंदिराचे सौंदर्य खूपच अद्भूत आणि मोहक आहे.

- Advertisement -

काय आहे इंडोनेशियातील तनाह लोट मंदिराचे रहस्य?

Tanah Lot Temple in Bali - Bali's Scenic Sea Temple - Go Guides

पौराणिक कथेनुसार, 15 व्या शतकात निरर्थ नावाचा एक पुजारी या समुद्रकिनाऱ्यावर फिरत होता. त्याला या ठिकाणच्या सौंदर्याची भुरळ पडली आणि त्याने इथेच राहण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणच्या सौंदर्यामुळे त्याने काही कोळ्यांच्या मदतीने मंदिर बांधलं. पौराणिक कथेनुसार, हे मंदिर समुद्राच्या देवाला समर्पित आहे. या मंदिरात रोज पूजा केली जाते. शिवाय इथे निरर्थ पुजाऱ्याची देखील पूजा केली जाते. शिवाय या मंदिरावर हिंदू धर्माचा अधिक प्रभाव आहे.

- Advertisement -

मंदिरात आहे विषारी सापाचं वास्तव्य

समुद्रामधील या मंदिरामध्ये विषारी सापाचं वास्तव्य आहे. ज्याचे स्थान एका दगडाखाली आहे. तो या मंदिराचे रक्षण वाईट शक्ती आणि घुसखोऱ्यांपासून करतो. असं म्हटलं जातं की, पुजारी निरर्थने आपल्या सामर्थ्याने या विशाल सागरी नागाला प्रकट केले जो आजही त्या मंदिराचे रक्षण करतो.

 


हेही वाचा :

देशात ‘या’ गुहेमध्ये आहेत पुरातन मंदिर

- Advertisment -

Manini