घर देश-विदेश जो मुलगा नालायक असतो, तो आपल्या पूर्वजांना दोष देत असतो..., काँग्रेसची भाजपावर...

जो मुलगा नालायक असतो, तो आपल्या पूर्वजांना दोष देत असतो…, काँग्रेसची भाजपावर टीका

Subscribe

मुंबई : भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 ही यशस्वीतेच्या उंबरठ्यावर आहे. पण यापार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये शब्दरण रंगले आहे. काँग्रेसने 70 वर्षांच्या काळात काय केले, या भाजपाच्या प्रश्नाला उत्तर देताना, जो मुलगा नालायक असतो तो आपल्या पूर्वजांना दोष देत असतो…, असे काँग्रेसने म्हटले आहे.

- Advertisement -

अलीकडेच मध्य प्रदेशात भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेसने आपल्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत गरीबांसाठी काही केले नाही, असा थेट आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीबांचे ‘मसीहा’ म्हटले होते. पाकिस्तानच्या देशातील दहशतवादी कारवायांचा उल्लेख करत, अमित शहा यांनी, मोदी सरकारच्या काळात देशात शांतता असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा – Chandrayaan-3 बाबत विक्रम साराभाई यांच्या मुलाने व्यक्त केला आनंद, म्हणाले…

- Advertisement -

याला उत्तर देताना काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, जो मुलगा नालायक असतो तो आपल्या पूर्वजांना दोष देत असतो. भाजपाचे या देशातील योगदान काय, हा खरा प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा, देशासमोर अनेक प्रश्न होते. युद्ध सुरू होते, निर्वासितांचा प्रश्न होता, अन्नधान्याच्या उपलब्धतेचाही प्रश्न होता. पण तरीही विज्ञानाच्या मार्गानेच प्रगती करता येईल, हे ओळखूनच त्यांनी पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण ‘या’ व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची पोस्ट चर्चेत

चांद्रयान-3 चा आनंद आहे. ही प्रगती आर्यभट्टपासून सुरू झाली आणि त्याचे मूळ तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञानाच्या मार्गात आहे. 1962मध्ये नेहरुंनी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च स्थापन केली नसती तर आज इथवर पोहोचलो नसतो, असे त्यांनी अधोरेखित केले.

- Advertisment -