Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश IIT मंडीने तयार केलं खास ॲप,फक्त एका फोटोने बटाट्यावरील रोगाची मिळेल माहिती

IIT मंडीने तयार केलं खास ॲप,फक्त एका फोटोने बटाट्यावरील रोगाची मिळेल माहिती

आर्टिफिशियल इंटेलिजंस (AI) टेक्नोलॉजीने बटाट्यांच्या पानांवरील रोग ग्रस्त भागाची माहिती मिळते.

Related Story

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडी(IIT Mandi) मधे एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधना अंतर्गत बटाट्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यासांठी एका नवीन टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे. या अंतर्गत एका फोटोने बटाट्याची लागवड खराब आहे का चांगली याची माहिती मिळू शकते. रिसर्चर्स याने  कम्प्युटेशनल मॉडलद्वारे एक कम्प्यूटर ॲप तयार केलं आहे, या ॲपद्वारे बटाट्यांच्या पानाच्या फोटोद्वारे ब्लाइट म्हणजेच झुलसा रोगाची माहिती मिळते. हे संशोधन आईआईटी मंडीमधील स्कूल ऑफ कम्प्युटिंग अँन्ड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगच्या असोसीएट प्रोफेसर डॉ. श्रीकांत श्रीनिवासन यांच्या गायडंस अंतर्गत सेंट्रल पोटॅटो रिसर्च इंस्टिट्यूट (CPRI) शिमला सोबत मिळून करण्यात आलं आहे. या रिसर्चमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंस (AI) टेक्नोलॉजीने बटाट्यांच्या पानांवरील रोग ग्रस्त भागाची माहिती मिळते.(A special app created by IIT Mandi, only one photo will provide information on potato disease)

साधारणत: बटाट्यांवर ब्लाइट नावाचा रोग होतो. तसेच वेळीस यावर उपाय केला नाही तर आठवड्याभरात संपुर्ण बटाट्याी शेती खराब होण्याची शक्यता आहे. अगदि सुक्ष्म नजरेने देखरेख केल्यास या रोगाची माहिती मिळते. पण आता नव्याने आलेल्या टेक्नॉलॉजीमुळे फक्त बटाट्याच्या पानांच्या फोटोने बटाट्याची लागवडीला कोणत्या रोगाचा धोका आहे की नाही याची माहिती मिळते आणि शेतकरी वेळेतच कीटनाशकांची फवारणी करत बटाटे खराब होण्यापासून वाचवू शकतो.

- Advertisement -

या ॲपमुळे रोगग्रस्त दिसणाऱ्या पानांचा फोटो काढल्यावर हा ॲप रीयल टाइम कंन्फर्म करणार आणि बटाटे खराब आहेत की नाही याची माहिती देणार. शेतकऱ्याला यानंतर सावधानता बाळगत शेतात आजार रोखण्यासाठी किटकनाशकांची फवारणी केव्हा करावी लागेल याची खबर योग्य वेळेत मिळेल.हे हि वाचा – रशियन कोरोना लस Sputnik-v १४ मे रोजी झाली लाँच; जाणून घ्या आजची परिस्थिती- Advertisement -

 

- Advertisement -