घर देश-विदेश संसदेचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात; लोकसभा निवडणुकांच्या नांदीची चर्चा

संसदेचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात; लोकसभा निवडणुकांच्या नांदीची चर्चा

Subscribe

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशातील तब्बल 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. या इंडिया आघाडीची तिसरी बैठक सध्या मुंबईत सुरू आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापू लागले आहे. दरम्यान मोदींविरोधात विरोधकांनी 28 पक्षांची मोट बांधत भाजपाला टक्कर देणारी इंडिया आघाडी उघडली आहे. याच इंडियाची बैठक मुंबईत सुरू असून, विविध विषयांवर चर्चा रंगू लागली आहे. या सर्व उलथापालथीमध्ये गुरुवारी दुपारी केंद्रीय संसदमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तेव्हा हे विशेष अधिवेशन म्हणजे पुढील लोकसभा निवडणुका वेळेआधीच घेतल्या तर जाणार नाही ना अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.(A special session of Parliament next month; A discussion on the run-up to the Lok Sabha elections)

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशातील तब्बल 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. या इंडिया आघाडीची तिसरी बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान या बैठकीच्या पहिल्याच दिवशी तिकडे दिल्लीतून एक नवी घोषणा झाली आहे. संसदेचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत यांनी पुढील म्हणजेच सप्टेंबर महिन्यात चार दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आपले उरलेले कामकाज लवकरच अटोपून तर घेत नाही ना असाही प्रश्न यानिमित्ताने विरोधांककडून विचारल्या जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : handrayaan-3: चांदोमामाच्या अंगणात गोल गोल फिरतंय प्रज्ञान रोव्हर; नवीन व्हिडीओ आला समोर

विरोधकांच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब होणार?

काही दिवसांपूर्वीच विरोधकांकडून असे दावे करण्यात आले होते की, यावेळी मोदी सरकार सार्वत्रिक निवडणुका वेळेआधी घेऊ शकतात. केंद्रातील मोदी सरकार जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुका घेऊ शकते, अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नुकतेच विधान या चर्चेला बळ देणारे आहे. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, हे लोक लोकसभेच्या निवडणुका वेळेआधीच घेऊ शकतात अशा वक्तव्यानंतर आता करण्यात आलेल्या घोषणेचा सहसंबंध जोडल्यास विरोकांच्या त्या शक्यता खऱ्या ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Crime : पत्नीशी संबंध असल्याचा संशय; रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलाचे केले चार तुकडे

भाजपने सुरू केली आहे निवडणुकांची तयारी

एकीकडे विरोधक एकत्र येऊन मोदींवर टीका करत असताना दुसरीकडे मात्र, भाजपकडून आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत गुंतला आहे. नरेंद्र मोदी यांनी मागील 9 वर्षात काय काय केले याचा प्रचार सुरू केला असून, विविध नव्या योजना आमंलात आणल्या जात असून, सर्वसामान्यांना आकर्षित करणाऱ्या घोषणाही केल्या जात आहे. दरम्यान आज केलेल्या विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतर उरलेले विधेयकं पारीत करून पुढील निवडणुकांचा मार्ग सुकर करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशीही चर्चा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे.

ममत बॅनर्जी यांनी वर्तवली होती शक्यता

ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकार डिसेंबरमध्येच लोकसभा निवडणुका घेऊ शकते, असा दावा केला होता. भाजपाने निवडणूक प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर्स आधीच बुक केले असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली होती. तृणमूल काँग्रेस युवा आघाडीच्या रॅलीला त्या संबोधित करत होत्या. भाजपा डिसेंबर 2023पर्यंत लोकसभेच्या निवडणुका घेऊ शकतात. भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर देश हुकूमशाहीकडे जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या, भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. प्रचारासाठी त्यांनी सर्व हेलिकॉप्टर बुक केले आहेत. इतर पक्षांना हेलिकॉप्टर मिळू नये म्हणून हे करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

- Advertisment -