घरCORONA UPDATEइंग्लंडच्या नदीत सापडले हिंदू संस्कृतीची साक्ष देणारे शिलान्यास 

इंग्लंडच्या नदीत सापडले हिंदू संस्कृतीची साक्ष देणारे शिलान्यास 

Subscribe

३८ वर्षीय मासेमार विल याला प्रथम या ठोकळ्यांकडे पाहून ते सामान्य आहेत, असे वाटले होते प्रत्यक्षात जेव्हा त्यांनी ते निरखून पहिले तेव्हा त्यांना त्यावर काही शब्द कोरलेली दिसून आली.

दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमारी व्यक्तीला ६० छोट्या आकाराच्या शीला सापडल्या, ज्या पुरातन असल्याचा अंदाज असून त्यावर हिंदू संस्कृतीतील प्रार्थनेशी संबंधित शब्द कोरलेले आहेत.

हे पाषाणाचे ठोकळे इतके छोटे आहेत की, ते सहजपणे नी आबोटांवर ठेवता येतात. ३८ वर्षीय मासेमार विल याला प्रथम या ठोकळ्यांकडे पाहून ते सामान्य आहेत, असे वाटले होते प्रत्यक्षात जेव्हा त्यांनी ते निरखून पहिले तेव्हा त्यांना त्यावर काही शब्द कोरलेली दिसून आली. ती हिंदू संस्कृतीतील एखाद्या प्रार्थनेसंबंधी असावेत, असे त्यांना जाणवले.

- Advertisement -

सध्या लॉकडाऊनच्या काळात ते चुंबकीय पद्धतीने मासेमारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विल हे सोवे नदीत मासेमारी करायला गेले होते. प्रथम त्यांना अनेक प्रकारची नाणी मिळाली, यानंतर जेव्हा त्यांनी पाण्यात बारकाईने पाहिले. तेव्हा त्यांना त्यात हे दगडाचे चौकोनी तुकडे सापडले, ज्याचा संबंध थेट हिंदू संस्कृतीशी जोडला जातो, असा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -