घरदेश-विदेशधोतर-कुर्त्यात रंगला क्रिकेटचा अनोखा सामना

धोतर-कुर्त्यात रंगला क्रिकेटचा अनोखा सामना

Subscribe

संस्कृत भाषेत करण्यात आले सुत्र संचालन

देशात क्रिकेट खेळण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही. मग ते लहान मुले असो किंवा वयोवृद्ध अनेकजण आपला छंद जोपासण्यासाठी क्रिकेट खेळतात. परंतु या आधी तुम्ही धोतर आणि कुर्ता परिधान केलेल्यांना क्रिकेट खेळताना कधी पाहिले नसेल. असाच धोती आणि कुर्त्याच्या वेशभूषेतील क्रिकेट सामना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रंगला आहे. या सामन्यात पुजाऱ्यांचा समावेश असून हा क्रिकेट सामना धोतर आणि कुर्ता परिधान करुन खेळला गेला आहे. सामन्यातील सुत्र संचालनही हिंदी-इंग्रजीमध्ये नसून संस्कृत भाषेत करण्यात आले आहे. रविवारी भोपाळमध्ये एक अनोखी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या क्रिकेट स्पर्धेची खास बाब म्हणजे सर्व खेळाडू हे व्यावसायिक नसून पुजा-पाठ करणारे पुजारी होते. या पुजाऱ्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी केली. सामन्यादरम्यान खेळाडू संस्कृतमध्ये एकमेकांशी बोलत होते.

- Advertisement -

गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि भाळावर टीळा

जेव्हा खेळाडू मैदानावर उतरले तेव्हा एक वेगळंच वातावरण दिसले. खेळाडूंच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ पाहून पुजारी एखाद्या यज्ञ, हवन किंवा पूजेसाठी तयार झाला असल्याचे वाटले. पण क्रिकेट सामन्यासाठी ही तयारी होती. क्रिकेट सामन्यादरम्यान सूत्रसंचालन हे हिंदी किंवा इंग्रजीत नव्हते तर संस्कृत भाषेत होते.

संस्कृति बचाव मंचने केले होते आयोजन

संस्कृति बचाव मंचचे चंद्रशेखर तिवारी यांनी सांगितले की संस्कृत भाषेची जाणीव व्हावी यासाठी ही अनोखी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भोपाळमधील अनेक पुजाऱ्यांनी धोती कुर्ता परिधान करून क्रिकेट खेळला. विशेष म्हणजे सामन्यादरम्यान पंडितांनी जोरदार चौकार आणि षटकार लगावले. यावेळी, ही स्पर्धा केवळ राजधानी भोपाळच नाही तर संपूर्ण मध्यप्रदेशातील आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -