घरट्रेंडिंगपेन्सिल मागितल्यावर आई मारते... इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या कृतीने महागाईबद्दल पंतप्रधानांना लिहिलं...

पेन्सिल मागितल्यावर आई मारते… इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या कृतीने महागाईबद्दल पंतप्रधानांना लिहिलं अनोखं पत्र

Subscribe

पंतप्रधान मोदी यांना हे पत्र लिहिणाऱ्या मुलीचं नाव कृति दुबे आहे. उत्तरप्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ नगर येथील विशाल दुबे यांची ६ वर्षाची मुलगी कृतिने एक पत्र नरेंद्र मोदी यांनी लिहित वाढत्या महागाईची जाणीव करून दिली आहे.

छिबरामऊ नगर येथील एका शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीनीने पंतप्रधान मोदी यांना वाढत्या महागाईबाबत एक अनोखं पत्र लिहिलं आहे. या अनोख्या पत्राची आता सर्वत्र चर्चा होत असून सध्या हे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्या मुलीने पत्रात लिहिलंय की, मोदीजी! तुम्ही खूप महागाई वाढवली आहे. मेरी मॅगीची किंमत सुद्धा वाढली आहे. पेन्सिल मागितल्यावर माझी आई मला मारते. मी काय करू? शाळेतली मुलं माझी पेन्सिल चोरतात. अशाप्रकारचं एक पत्र या लहान मुलीने नरेंद्र मोदींना लिहिलंय.

पंतप्रधान मोदी यांना हे पत्र लिहिणाऱ्या मुलीचं नाव कृति दुबे आहे. उत्तरप्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ नगर येथील विशाल दुबे यांची ६ वर्षाची मुलगी कृतिने एक पत्र नरेंद्र मोदी यांनी लिहित वाढत्या महागाईची जाणीव करून दिली आहे. या पत्रामध्ये कृतिने लिहिलंय की, जेव्हा ती दुकानात मॅगी खरेदी करायला गेली, तेव्हा दुकानदाराने दोन रूपये कमी असल्यामुळे तिला पुन्हा घरी पाठवलं. त्या मुलीने सांगितलं की, दुकानदार काका म्हणाले की, मॅगी महाग झाली आहे आणखी दोन रूपये घेऊन ये आणि मग घेऊन जा.

- Advertisement -

कृति दुबे सुप्रभाष अकादमीमधील पहिल्या इयत्तेची विद्यार्थीनी आहे. या मुलीने खूप निरागसतेने हे पत्र लिहिलं आहे. या मुलीच्या आई-वडीलांच्या मते कृतिने हे पत्र स्वताः तिच्या मनाने लिहिलं आहे. शिवाय तिने पत्र आपल्या वडीलांना सांगून डाकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हेही वाचा :देशात जुलैमध्ये 1.49 लाख कोटींचे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -