हजारो फूट उंचावरून खाली येणारी महिला हवेमध्येच खाऊ लागली चॉकलेट केक

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. याचं कारण म्हणजे या व्हिडीओमधील एक महिला आपल्या खाण्याच्या अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून यूजर्स अनेक कमेंट करू लागले आहेत.

अनेकजण विविध पदार्थ खाण्याचे खूप शौकीन असतात. काहीजण प्रवासामध्ये तर काहीजण चालता-फिरता कोणती ना कोणती गोष्ट खात असतात. आपल्यापैकी अनेकजण घरामध्ये शांत बसून जेवणाचा आस्वाद घेतात. परंतु काहीजण असेही असतात जे कधीही आणि कुठेही कोणत्याही परिस्थितीत आपली खाण्याची आवड जोपासतात. आता असाच एक अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला हजारो फूटाच्या उंचावरून हवेमध्ये देखील आपल्या आवडीच्या पदार्थाचा आस्वाद घेताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. याचं कारण म्हणजे या व्हिडीओमधील एक महिला आपल्या खाण्याच्या अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून यूजर्स अनेक कमेंट करू लागले आहेत. व्हिडीओमधील महिला हजारो फूटाच्या उंचीवरून हवेमध्ये खाली पडताना चॉकलेट केक खाताना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर लोक त्या महिलेच्या अतरंगी स्टाईलला मूर्खपणा म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mckenna Knipe (@mckennaknipe)

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ मॅककेना नाइप नावाच्या एका महिलेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. असं सांगितलं जातंय की, मॅककेना एक इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. जी आपल्या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हजारो फूटांच्या उंचावर हवेमध्ये चॉकलेट केक खाताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये मॅककेना हवाई जहाजातून हजारो फूटाच्या उंचावरून खालच्या दिशेला उडी मारते. त्यानंतर ती हळूहळू तिचं पॅराशूट उघडते. यादरम्यान, तिच्या हातामध्ये चॉकलेट केकचा डब्बा दिसतो. जो ती हवेमध्ये खोलून खाऊ लागते. तिचा हा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

 


हेही वाचा :

वृद्ध जोडप्याला सापडल्या जुन्या नोटा, तब्बल ४७ लाखांचा धनलाभ