घरदेश-विदेशधक्कादायक: विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची गावभर काढली 'अशी' धिंड

धक्कादायक: विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची गावभर काढली ‘अशी’ धिंड

Subscribe

भोपाळमधील झबुआ जिल्ह्यात विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्याने महिलेला तिच्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन तिची गावभर धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.

झाबुआ जिल्ह्यातील देवीगाव गावामध्ये एका महिलेला अजब शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची तिच्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर धिंड काढली असल्याचा प्रकार उघड झाला आहे. महिलेचे विवाहबाह्य संबंध उघडकीस अल्याने जात पंचायतीने ही शिक्षा महिलेला सुनावली होती. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

विवाहबाह्य संबंध असलेल्या त्या महिलेची देवीगाव येथील गावकारांनी आपल्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर धिंड काढली आहे. त्यासंबंधीत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेवर गावातील काही तरुण जोरजोरत शिट्ट्या मारत नाचत असून काही जण तर याची मजा घेत व्हिडिओ काढत आहे. तर महिलेला प्रचंड दमली असून तिला चालण्यास जबरदस्ती केली जात आहे.

- Advertisement -

पोलिसांनी तात्काळ केली कारवाई

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्याने आरोपींविरोधात कारवाई करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीसाठी पोलीस दलाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसडीओपी यांच्यासह गावात पाठवण्यात आले आहे. तर विवाहबाह्य संबंधामुळ गावातील जेष्ठ मंडळीनी आणि सासरच्या मंडळीने तिला शिक्षा दिली असल्याचे पोलिसांकडून उघड झाले आहे. पोलिसांनी महिलेला शिक्षा देणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस महानिरिक्षक विनीत जैन यांनी सांगितले की, इतर सर्व आरोपींनासुद्धा लवकरच अटक केले जाईल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -