Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी झारखंडमध्ये एका महिलेने दिला पाच बाळांना जन्म

झारखंडमध्ये एका महिलेने दिला पाच बाळांना जन्म

Subscribe

झारखंडमध्ये एका महिलेने पाच बाळांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. रांची येथील रीम्स रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाली असून त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्यासोबतच या पाच मुलांचा फोटोसुद्धा शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलांची आई आणि मुलं निरोगी असून हे बाळं एनआयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखेखाली असल्याची माहिती आहे. रीम्स रुग्णालयाने ट्वीटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, इटखोरी चतरा येथील एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला आहे. डॉ. शशी यांच्या नेतृत्वाखाली प्रसूती झाली आहे. तसेच ही मुलं NICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्व नवजात बालकांना निओनॅटोलॉजी विभागात दाखल केले असून या मुलांचे वजन सामान्यापेक्षा खूपच कमी आहे. या चिमुकल्याचे वजन केवळ एक किलो ते ७५० ग्रॅम असल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

या मुलांची आई आणि मुलं हे दोघेही चांगले आहेत. डॉक्टरांचे पथक आई आणि मुलांवर लक्ष ठेवून आहे, असं रीम्सने म्हटलं आहे. दरम्यान, एका महिन्यापूर्वी एका महिलेने ४ मुलांना जन्म दिला होता. त्या महिलेची सर्व मुले निरोगी होती, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा :UPSC 2022 Topper: मुलींचा डंका, देशातील सर्वोच्च परीक्षेत पहिल्या चार टॉपरमध्ये फक्त मुलीच; पाहा संपूर्ण


 

- Advertisment -