कोलकातामधील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोळीबार, एका महिलेचा मृत्यू

kolkata

कोलकाता (Kolkata City) शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकातामधील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर (Bangladesh High Commission) गोळीबार झाला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्याने (Kolkata Police) झाडलेल्या गोळीत एका महिलेचा मृत्यू (A woman biker died) झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, धक्कादायक म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडली त्यानेच स्वत:वरही गोळी झाडली आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

पार्क सर्कस परिसरात बांगलादेश उच्चायुक्तालयाजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मात्र, या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेची हत्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती दुचाकीवरून जात होती. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १० ते १५ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला गोळ्या लागल्या आणि तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोण आहे, याबाबत अद्यापही अधिक माहिती मिळालेली नाहीये. मात्र, जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेनंतर पोलीस फाटा तैनात करण्यात आला असून परिसरातील दुकानेही बंद करण्यात आले आहेत.


हेही वाचा : मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार – राज्यमंत्री बच्चू कडू