आधार कार्ड बाबतच्या तक्रारींसाठी ‘या’ नंबरवर संपर्क करा

UIDAI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हेल्‍पलाइन क्रमांकाची दिली माहिती

aadhaar helpline number 1947 uidai twitted 12 languages
आधार कार्ड बाबतच्या तक्रारींसाठी या नंबरवर संपर्क करा

पॅन कार्ड, मतदान ओळखपत्रसह आधार कार्डदेखील भारतीय असल्याचा पुरावा मानला जातो. त्यामुळे सराकारी कामांपासून ते खाजगी कामांमध्ये पुरावा म्हणून आधी आधार कार्ड आहे का विचारतात. परंतु या आधार कार्डसंबंधीत समस्या कशी सोडायच्या असा प्रश्न असतो. अनेकांचे आधार कार्डच गहाळ होते, मोबाईल नंबर लिंक नसतो, जन्म तारीख, राहण्याचा पत्ता तसेच स्वत;चे नावही अनेकदा चुकीचे असते. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी अनेकदा पोस्ट ऑफिस संबंधित आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागतात. परंतु UIDAI आता तुमच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. त्यामुळे आधार संबंधित तुमच्या समस्या या क्रमांकामुळे सोडवू शकणार आहात.

आधार संबंधित समस्या सोडवण्यासाठी आधार प्रणाली राबविणाऱ्या UIDAI ने हेल्‍पलाइन क्रमांक 1947 (Aadhaar helpline 1947) सुरु केला आहे. या क्रमांकावर तुम्हाला १२ भाषांचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे आधारकार्डसंबंधीत कोणत्याही समस्यांचे उत्तर मिळू शकते. UIDAI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. या नंबरवर मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू भाषांमध्ये सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे एक कॉलसेंटरप्रमाणे हे सेंटर तुम्हाला UIDAI सेवा, समस्यांची माहिती देणार आहे.

सध्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ऑक्टोबर २०१९ मध्ये आधार कार्डचं नवं प्रिटींग सुरु केलं आहे. त्यामुळे आधार पीव्हीसी कार्ड हे नवं कार्ड तुम्ही आता मिळवू शकणार आहात. हे आधार पीव्हीसी कार्ड एटीएम आणि डेबिट कार्डप्रमाणे आहे. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या एकाच मोबाइल क्रमांकावरुन संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधारकार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या पीव्हीसी आधारकार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.