आधारकार्ड संबंधित सर्व चिंता मिटणार ; ‘UIDAI’ने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

आधार कार्डशी संबंधित सर्व चिंता आता मिटणार आहेत. UIDAI ने यासाठी एक विस्तृत खाका तयार केला आहे. प्राधिकरणाने यासाठी आधार सेवा केंद्र परियोजनाची तयारी केली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात देशातील 53 शहरांमध्ये 114 आधार सेवा केंद्र बनवण्याची योजना आखण्यात आली आहे. या केंद्रांवरती आधार एनरोलमेंटसह अपडेट करण्यासह आधारकार्डशी निगडीत सर्व सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

'Aadhaar sewa kendra' start at some places in india ; UIDAI takes important decision
आधारकार्ड संबंधित सर्व चिंता मिटणार ; 'UIDAI'ने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आधार कार्डशी संबंधित सर्व चिंता आता मिटणार आहेत. UIDAI ने यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने यासाठी ‘आधार सेवा केंद्र’ परियोजनाची तयारी केली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात देशातील 53 शहरांमध्ये 114 आधार सेवा केंद्र बनवण्याची योजना आखण्यात आली आहे. या केंद्रांवरती आधार एनरोलमेंटसह अपडेट करण्यासह आधारकार्डशी निगडीत सर्व सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

‘या’ शहरात सुरु होणार आधार सेवा केंद्र

प्राधिकरणने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. UIDAI च्या वेबसाइटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 53 शहरांना निवडण्यात आले आहे. यामध्ये सर्व मेट्रो सिटीज आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. याशिवाय अनेक प्रमुख शहरांचा या पहिल्या टप्प्यात समावेश असणार आहे. आतापर्यंत देशात 35 हजारांपेक्षा जास्त आधार केंद्र सेवेत आहेत. हे केंद्र बँक,पोस्ट ऑफीस आणि बीएसएनएलच्या कार्यालयामध्ये चालू आहेत.

काय आहेत आधार कार्डसाठी लागणारे चार्ज ?

आधार सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या काही सुविधा या फ्रि असणार आहेत. 5 ते 15 वर्षाच्या मुलांना बायोमॅट्रीक अपडेट करणे फ्री असणार आहे. त्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी 100रुपये चार्ज असणार आहे. वैयक्तिक डिटेल्स अपडेट
करण्यासाठी 50 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय आधार डाऊनलोड आणि कलर प्रिंटसाठी 30 रुपये चार्ज असणार आहे.

UIDAI च्या माहीतीनुसार, आधार सेवा केंद्र हे आठवड्याचे सातही दिवस सेवा पुरवणार आहे. ही सेवा सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 च्या सुमारास असणार आहे. या आधार कार्ड सेवा केंद्रात एसी याशिवाय दिव्यांग नागरिकांसाठी व्हिल चेअर यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय आधारकार्ड बनवणे, डाउनलोड करणे त्याची प्रिंट काढणे या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय कोणताही भारतीय नागरिक या केंद्रावर जाऊन आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी यांसारखी माहिती बदलू किंवा अपडेट करु शकता. आधाक कार्ड सेवा केंद्रांमध्ये फोटो, फिंगरप्रिंट आणि आइरिस अपडेट करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. या परियोजनेनुसार, आधार प्राधिकारणाने ऑनलाइन अपॉइन्टमेंट बुकिंग सुविधा उपलब्ध असणार आहे. एका व्यक्तीला एका महिन्यात जास्तीत जास्त 4 वेळा अपॉइन्टमेंट बुक करण्याची सुविधा आहे.

 


हे ही वाचा – मुंबई महापालिकेत केवळ भाजपचंच कमळ फुलणार, आशिष शेलारांचं मोठं विधान