घरदेश-विदेशकर्नाटक निवडणुकीत 'आप'ला झटका, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

कर्नाटक निवडणुकीत ‘आप’ला झटका, सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Subscribe

आम आदमी पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. ‘आप’चे नेता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा कोणताही प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही. परिणामी ‘आप’च्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरातनंतर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही ‘आप’ला मोठा झटका बसला आहे.

कर्नाटक निवडणुकीत ‘आप’ने २२२ जागांपैकी फक्त २८ जागांवर उमेदवार उभे केले. २८ पैकी १६ मतदारसंघातील उमेदवारांना ५०० मतं देखील मिळवता आली नाहीत. ‘आप’च्या सर्व उमेदवारांना अवघी २१ हजार मतं मिळाली.
प्रचारादरम्यान दिल्लीतील विकास मॉडलचे स्वप्न मतदारांना दाखवण्यात आले. पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावावर मतं मागितली. परंतु, कर्नाटकातील जनतेने त्यांना नाकारल्याचे चित्र या निकालाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

- Advertisement -

‘आप’चे राज्यसभेतील खासदार संजय सिंग यांनी केजरीवाल यांच्या नावाचा पुरेपूर वापर निवडणूक प्रचारादरम्यान केला. भ्रष्टाचारमुक्त देश हा आमचा मुख्य मुद्दा असल्याचे सिंग यांनी म्हटले होते. मात्र, नागरिकांनी ‘आप’कडे पाठ फिरवली. दिल्ली वगळता ‘आप’ला कोणत्याही राज्यात स्थान निर्माण करता आले नाही.

ईशान्य भारतातील नागालँड आणि मेघालय राज्यातील निवडणुकांमध्येही ‘आप’ला निराशा हाती लागली होती. माजी मंत्री आणि ‘आप’चे नेते कपिल मिश्रा यांनी सांगितले की, “मेघालयच्या विधानभा निवडणुकीत ‘आप’ने फक्त ६ जागांवर उमेदवार दिले होते. त्यांना सर्व मिळून १४० मतं मिळाली होती. यापेक्षा जास्त मतं ‘नोटा’ला मिळाली होती. नागालँडमध्येही ‘आप’ला एकूण ७३५५ मतं मिळाली.” कर्नाटक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कपिल मिश्रा यांनी आपल्याच पक्षाला चिमटा काढत हे वक्तव्य केले.

- Advertisement -

२०१७ ला झालेल्या पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात येथील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला अपेक्षित यश मिळवता आले नाही. गोव्यातील निवडणुकीतही आपचे डिपॉझिट जप्त झाले होते. तर २७ फेब्रुवारी २०१८ ला पंजाबमधील लुधियाना येथे पार पडलेल्या नगर पंचायतच्या ९५ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत ‘आप’ला मोठा झटका बसला. ‘आप’चा एकच उमेदवार यावेळी निवडून आला होता.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -