घरताज्या घडामोडीBhagwant Mann Oath Ceremony: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा; १९ मार्चला मंत्रिमंडळ...

Bhagwant Mann Oath Ceremony: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा; १९ मार्चला मंत्रिमंडळ विस्तार

Subscribe

मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी आज सकाळी भगवंत मान यांनी ट्वीट करून खटकड कलांकडे रवाना होत असल्याची दिली माहिती

पंजाबमध्ये आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party – आप) बहुमताने विजयी झाल्यानंतर आज भगवंत मान (Bhagwant Mann) नवांशहरच्या खटकड कलामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा (Oath Ceremony) संस्मरणीय राहण्यासाठी आपने जय्यत तयारी केली आहे. आज भगवंत मान एकटेच शपथ घेतली आणि १९ मार्चला त्यांचे मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. भगवंत मान शहीद भगत सिंग यांचे मूळ गाव खटकड कलांमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. भगवंत मान हे पंजाबचे २६वे मुख्यमंत्री असणार आहे. तसेच पंजाबच्या पुनर्रचनेनंतरचे (१९६६) ते १९वे मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी आज सकाळी भगवंत मान यांनी ट्वीट करून खटकड कलांकडे रवाना होत असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

माहितीनुसार, भगवंत मान यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यात विविध जिल्ह्यातून लोकांना आणण्यासाठी दोन हजार बसेसची व्यवस्था केली आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे संपूर्ण मंत्रिमंडळ नवांशहरच्या खटकड कलांमध्ये पोहोचतील.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यासाठी आपने गोव्यातील दोन आमदार, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार आणि उत्तराखंडच्या आपच्या नेत्यांना आमंत्रण दिले आहे. दरम्यान भगवंत मान यांनी माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, कॅप्टन अमरिंदर सिंह, चरणजीत सिंह चन्नी सारख्या नेत्यांना आमंत्रण दिले आहे की नाही? हे स्पष्ट झालेले नही.

- Advertisement -

भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहण्याबाबत पंजाब सरकारचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व राज्यातील मुख्यमंत्री येण्याबाबत त्यांना विचारले जात आहे. परंतु आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडून कोणत्याही इतर राज्याच्या मुख्यमंत्री येण्याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही.

१९ मार्च मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

आज दुपारी १२.१० वाजता पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित भगवंत मान यांना मुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्यानंतर सर्व आमदारांना १७ मार्चला विधानसभेत शपथ देण्यात येईल. मग १९ मार्चला मंत्रिमंडळाच्या इतर मंत्र्यांना राजभवनमध्ये बनवलेल्या गुरु नानक ऑडिटोरियमध्ये शपथ दिली जाईल. याची वेळ अद्याप ठरलेली नाही.

माहितीनुसार, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मंत्र्यांच्या शपथविधीबाबत आणि इतर काही मुद्द्यावर निर्णय घेतली. मंत्र्यांच्या शपथिविधीबाबत राजभवनाला तोंडी माहिती देण्यात आली आहे. याबाबत १७ मार्चला ऑडिटोरियमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. कारण राजभवनातील ऑडिटोरियमध्ये होणार हा पहिला सोहळा असणार आहे. अलीकडेच याचे उद्घाटन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -