अरविंद केजरीवालांना राजकीय जाहिराती प्रसिद्ध करणं भोवलं; DIP ने पाठवली 164 कोटींची वसुली नोटीस

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजकीय जाहिराती प्रसिद्ध करणं भोवल्याचं समोर आलं आहे. माहिती आणि प्रसारण संचालनालयाने केजरीवाल यांना 164 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. सरकारी जाहिरातींच्या नावाखाली राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली आहे.

10 दिवसात भरावी लागणार संपूर्ण रक्कम

माहिती आणि प्रचार संचालनालयाने (डीआयपी) जारी केलेल्या वसुलीच्या नोटीसमध्ये, ही रक्कम व्याजासह परफेड करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही रक्कम 10 दिवसांच्या आत संपूर्ण भरणे बंधनकारक आहे. दरम्यान आप ही दंडाची रक्कम भरण्यास अयशस्वी झाल्यास दिल्लीच्या उपराज्यपालांच्या मागील आदेशानुसार, पक्षाच्या मालमत्ता जप्तीसह सर्व कायदेशीर कारवाई कालबद्ध पद्धतीने केली जाईल.

यापूर्वी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांनी 2015-2016 या वर्षात मुख्य सचिवांना सरकारी जाहिरातींच्या नावाखाली प्रसिद्ध केलेल्या राजकीय जाहिरातींबाबत 97 कोटी रुपये ‘आप’कडून वसूल करण्याचे निर्देश दिले होते.उपराज्यपालांच्या निर्देशानंतर, दिल्ली सरकारच्या माहिती आणि प्रचार संचालनालयाने ही नोटीस जारी केली आहे.


शिंदे-फडणवीस सरकारला गुंतवणुकीपेक्षा राजकारण महत्त्वाचे; संजय राऊतांचा आरोप