घरताज्या घडामोडीArvind Kejriwal Arrest: केजरीवालांच्या अटकेविरोधात आज देशभरात निदर्शने; INDIA आघाडीही एकजूट

Arvind Kejriwal Arrest: केजरीवालांच्या अटकेविरोधात आज देशभरात निदर्शने; INDIA आघाडीही एकजूट

Subscribe

नवी दिल्ली – कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला ईडीने अटक करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. दिल्ली उच्च न्यायलयाने केजरीवाल यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला, तेव्हाच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची एक रात्र तुरुंगात गेली आहे. आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यासोबत त्यांच्या अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला ईडीने अटक करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. याआधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. मात्र हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती.

- Advertisement -

ईडीचे नऊ समन्स, दहाव्याला अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 2021-22 मधील कथित मद्य धोरण घोटाळ्याचा सीबीआयचा आरोप आहे. ईडी या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. केजरीवाल सरकारने नंतर हे मद्य धोरण रद्द केले. मात्र या घोटाळ्यात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी नऊ समन्स बजावले होते. ते चौकशीला सामोरे गेले नाही. गुरुवारी ईडीची टीम 10वे समन्स घेऊन केजरीवालांच्या दारात गेली होती.

दरम्यान, केजरीवालांनी अटकेपासून वाचण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र तो फेटाळला गेला, आणि अखेर मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला ईडीकडून अटक करण्यात आली.
केजरीवालांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडी एकजुटीने उभी राहिली आहे. शरद पवारांनी केजरीवालांच्या अटकेचा विरोध केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे, हे देशासाठी चांगले नाही, असे पवारांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमित शहा यांच्या शेजारी अनेक जण आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

आज देशभर निदर्शने

शंभर कोटींच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यात केजीरवालांना अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. गुरुवारी रात्री केजरीवालांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर आज देशभरात आम आदमी पार्टी निदर्शने करणार असल्याची घोषणा आपचे नेते गोपाल राय, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक यांनी केली आहे. ही लढाई रस्त्यापासून कोर्टापर्यंत लढली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांच्या तपासात सीबीआय आणि ईडीला एक पैसाही मिळालेला नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली. ईडीला शस्त्र बनवून सुरु असलेले राजकारण सत्ताधाऱ्यांनी बंद करावे, असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटलं.

आज केजरीवालांना पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला अटक करण्याचे ही पहिली घटना असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांचा संताप, म्हणाले – भाजपाच्या आता दोन जागाही…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -