घरदेश-विदेशआपचे नायब राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, आमदार करणार दिल्ली विधानसभेत मुक्काम

आपचे नायब राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, आमदार करणार दिल्ली विधानसभेत मुक्काम

Subscribe

दिल्ली – आम आदमी पक्षाच्या जाहीर केले आहे की, त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार आज रात्री दिल्ली विधानसभेत थांबतील आणि नायब राज्यपालांचा विरोध करतील. याबाबत माहिती देताना आपचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले संध्याकाळी सर्व आमदार महात्मा गांधी पुतळ्याखाली बसतील आणि रात्रभर विधानसभेत राहून नायब राज्यपालांचा निषेध करतील. आम आदमी पक्षाने दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना  यांच्यावर नोटाबंदीच्या काळात 1400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

सोमवारी दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असताना 1400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. पक्षाने आपल्या आरोपात म्हटले आहे की, विनय कुमार सक्सेना यांनी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असताना नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी जुन्या नोटा नव्या नोटांमध्ये बदलून घोटाळा केला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावावर 1400 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आपने केला आहे.

- Advertisement -

नोटाबंदीच्या काळात लाखो लोकांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावेळी नायब राज्यपाल 1400 कोटींचा घोटाळा करण्यात व्यस्त होते. एलजी विनय सक्सेनाचा घोटाळा ज्यांनी उघडकीस आणला ते अत्यंत गरीब होते. पण त्यांनी धीर सोडला नाही. प्रत्येक मंचावर तक्रार करून आमच्याकडून चुकीचे काम करून घेतेले जात असल्याचे ते म्हणाले.  मात्र, राज्यपालांनी स्वत:च तपासाची धुरा सांभाळली. दोन्ही तक्रारदारांना निलंबित करून त्यांच्या भ्रष्ट साथीदारांना बढती देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -