घरदेश-विदेशदिल्लीत अरविंद केजरीवालांचा आमदार फुटला

दिल्लीत अरविंद केजरीवालांचा आमदार फुटला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; ‘आप’समोर बंडखोरीचे आव्हान

राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा सत्ता आणण्यासाठी जोर लावला आहे. मात्र यंदा केजरीवाल यांना रोखण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शड्डू ठोकला आहे. अशा परिस्थितीत आमदारांची फुटाफुटी होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे विद्यमान आमदार फतेह सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

या दोघांचेही स्वागत करताना ‘दिल्ली अभी दूर नहीं’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. फतेह सिंह हे गोकुळपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. ‘आप’ने 70 उमेदवारांची यादी जाहीर करताना, 15 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले. यामध्ये फतेह सिंह यांचेही नाव आहे. फतेह सिंह यांच्याऐवजी चौधरी सुरेंद्र कुमार यांना आपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज फतेह सिंह यांनी बंडखोरी करत, राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना गोकुळपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. फतेह सिंह गोकुळपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. 2015 मध्ये ‘आप’कडून लढताना फतेह सिंह यांना 71240 मते मिळाली होती. त्यांनी भाजपच्या रंजित सिंह यांचा 31,938 मतांनी पराभव केला होता.

- Advertisement -

केजरीवालांविरोधात 65 उमेदवार
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 65 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापैकी बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत. भाजपकडून सुनील यादव, तर काँग्रेसकडून रोमेश सभरवाल निवडणूक लढवणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहा तास वाट पाहावी लागली होती. केजरीवाल अर्ज भरण्यासाठी सहकुटुंब दाखल झाले, तेव्हा त्यांना 45 नंबरचं टोकन देण्यात आल होतं. अखेर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचा नंबर लागला होता. केजरीवाल सोमवारीही निवडणूक अर्ज भरण्यासाठी निघाले होते. परंतु रोड शोमध्ये तूफान गर्दी असल्यामुळे ते जामनगर हाऊसपर्यंत पोहचू शकले नव्हते. अखेर मंगळवारी केजरीवालांनी निवडणूक अर्ज दाखल केला. स्थानिक टीव्ही वाहिनी ‘पृथ्वी दर्शन’चे मालिक योगी माथुरही केजरीवालांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. ‘केजरीवाल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्यास अपात्र आहेत, राजकीय नेत्याने काय करायला हवं, हे आपण दाखवून देणार’ असल्याचे माथुर म्हणाले. याशिवाय वकील, शिक्षकही केजरीवालांविरोधात निवडणूक लढवत आहेत. 50 पेक्षा जास्त उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत किंवा त्यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -