घरदेश-विदेशउपराज्यपालांनी पाठवलेली मानहानीची नोटीस संजय सिंहांनी भर पत्रकार परिषदेत फाडली

उपराज्यपालांनी पाठवलेली मानहानीची नोटीस संजय सिंहांनी भर पत्रकार परिषदेत फाडली

Subscribe

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी बजावलेली मानहानीची नोटीस भर पत्रकार परिषदेत फाडली. भारताचं संविधान मला खरं बोलण्याचं अधिकार देतो, असं परखड मत त्यांनी मांडलं. देशाच्या सर्वोच्च सभागृहातील सदस्य असल्या कारणाने मला खरं बोलण्याचा अधिकार आहे. चोर, भ्रष्ट व्यक्तीने नोटीस पाठवल्याने मी थांबणारा किंवा घाबरणारा नाही. अशा नोटीशींना मी १० वेळा फाडून फेकून देईन.

हेही वाचा – आपच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार, नायब राज्यपालांचे आदेश

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी भाजप आणि आप पक्षात जोरदार खडाजंगी सुरू आहे. याप्रकरणी ईडीने छापेमारीही केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्कावर कमिशन घेत असल्याचा आरोप स्टिंग ऑपरेशन राबवत भाजपाने केला होता. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन केलं होतं.

संबित पात्राच्या आरोपाला मनीष सिसोदिया यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे. भाजपाल आरोप करते की राज्य उत्पादन शुल्कात आपने १३०० कोटीचा घोटाळा केलाय, नंतर म्हणजे ८ हजार कोटीचा केलाय, नंतर हाच आकडा ५०० कोटींवर येतो. कधी १४४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतात. सीबीआईने एफआयआर दाखल केल्यावर सखोल चौकशीअंती त्यांनी दोन कंपन्यातील असलेल्या व्यवहाराबाबत जबरदस्ती माझ्यावर आरोप केले. दारु निती आयोगात कमिशनखोरी झाल्याचा आरोप संबित पात्रांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना मनीष सिसोदियांनी विचारलं की, कंत्राटदारांचं कमिशन का वाढवलं?

- Advertisement -

हेही वाचा – आपने केलेल्या आरोपांची चौकशी करा, भाजपा खासदारांचे उपराज्यपालांना पत्र

राहुल गांधींनीही फाडला होता अध्यादेश

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पारीत केलेला एक अध्यादेश राहुल गांधी यांनी अशाच प्रकारे फाडून टाकला होता. २०१३ साली लोकांसमोरच हा अध्यादेश फाडून टाकण्यात आला होता. तेव्हा हे प्रकरण बरंच गाजलं होतं. यानंतर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -