Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश INDIA आघाडीत सहभागी झालेल्या 'AAP' ने मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये निवडणुकीसाठी थोपाटले दंड

INDIA आघाडीत सहभागी झालेल्या ‘AAP’ ने मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये निवडणुकीसाठी थोपाटले दंड

Subscribe

देशातील तब्बल 28 पक्षांनी एकत्र येत मोदीविरुद्ध आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडलेल्या आहेत. या तिन्ही बैठकांमध्ये या आघाडीतील सदस्य पक्षांमध्ये काही अंशी मतभेदसुद्धा पहायला मिळाले आहेत.

नवी दिल्ली : 2024 मधील लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सत्तेतील एनडीएविरुद्ध विरोधकांनी इंडिया आघाडी उघडलेली आहे. या आघाडीत तब्बल 28 पक्ष सहभागी झालेले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. असे जरी असले तरी कॉंग्रेसला दिल्ली आणि पंजाबमध्ये धोबीपच्छाड देणाऱ्या आपने छत्तीसगडमध्ये सत्तेतील कॉंग्रेसविरुद्ध दहा उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आपचे नेमके चालले तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (‘AAP’, which participated in the INDIA alliance, imposed fines for elections in Madhya Pradesh, Chhattisgarh)

देशातील तब्बल 28 पक्षांनी एकत्र येत मोदीविरुद्ध आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडलेल्या आहेत. या तिन्ही बैठकांमध्ये या आघाडीतील सदस्य पक्षांमध्ये काही अंशी मतभेदसुद्धा पहायला मिळाले आहेत. यादरम्यान आता लोकसभा निवडणुकांआधीच छत्तीसगडसह मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना आता आम आदमी पक्षाने छत्तीसगडसह मध्यप्रदेशमध्येही आपले दहा-दहा उमेदवार जाहीर केले आहेत. तेव्हा एकीकडे इंडिया आघाडीत रहायचे आणि दुसरीकडे स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे यावरून आपच्या मनात चालले तरी काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

आतापर्यंत या पक्षांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

- Advertisement -

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये बीएसपीने 8 ऑगस्ट रोजी 9 उमेदवार तर त्यानंतर भाजपने 17 ऑगस्ट रोजी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर सध्या छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे सरकार असून, त्यांनी अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. तर त्याआधीच आम आदमी पक्षाने त्यांच्या 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसला याचा फटका बसू शकतो हे निवडणूक निकालावरून दिसून येणार आहे.

हेही वाचा : G-20 शिखर परिषद: प्रवेशद्वारात शंख, भिंतींवर भारतीय संस्कृतीचं दर्शन; जाणून घ्या, भारत मंडपमची दहा वैशिष्ट्य

हे आहेत जाहीर झालेले आपचे संभाव्य उमेदवार

- Advertisement -

आपने छत्तीसगडमध्ये दहा संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दंतेवाडा मतदार संघासाठी बालू राम भवानी, नारायणपूरसाठी नरेन्द्रकुमार नाग, अकलतरामध्ये आनंद प्रकाश मिरी, भानुप्रतापपूर कोमल हुपेंडी, कोरबा विशाल केलकर, राजिममध्ये तेजराम विद्रोही, पत्थलगांवमध्ये राजा राम लकडा कवर्धा खडगराज सिंह, भटगांव सुरेन्द्र गुप्ता आणि कुनकुरी विधानसभा मतदार संघामधून लेओस मिंज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजस्थानात काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश

मध्यप्रदेशातही 10 उमेदवारांची यादी जाहीर

आम आदमी पक्षाने छत्तीसगडसोबतच मध्यप्रदेशमध्येही आपल्या दहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रिवा जिल्ह्यातील सिरमौर विधानसभा मतदार संघातील माजी मंत्री स्व. सीता प्रसाद शर्मा यांच्या सुनेला उमेदावारी दिली असून, त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

- Advertisment -