घरदेश-विदेशसर्वात मोठा बँकिंग घोटाळा! ABG शिपयार्डविरोधात FIR, 28 बँकांची 22,842 कोटींची फसवणूक

सर्वात मोठा बँकिंग घोटाळा! ABG शिपयार्डविरोधात FIR, 28 बँकांची 22,842 कोटींची फसवणूक

Subscribe

बँकांची फसवणूक प्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनीविरोधात (ABG Shipyard) आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वाखालील 28 बँकांच्या कंसोर्टियमसह 22,842 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सीबीआयने आतापर्यंत नोंदवलेल्या बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांपैकी हे सर्वात मोठे प्रकरण आहे.

अग्रवाल व्यतिरिक्त एजन्सीने तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवेटियासह आणखी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या आणखी एक कंपनीविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, विश्वासघात करणे आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

8 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेने पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती. यावर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी काही स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर बँकेने त्याच वर्षी ऑगस्टमध्ये नवीन तक्रार दाखल केली. सुमारे दीड वर्ष तपास केल्यानंतर सीबीआयने तक्रारीवर कारवाई करत 7 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रार दाखल केली.
कंपनीने 28 बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे आणि SBI चे सुमारे 2,468.51 कोटी रुपयांचे एक्सपोजर आहे.

फॉरेन्सिंग ऑडिटमध्ये असे समोर आले की, 2012-17 दरम्यान या आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने फंड डायवर्ट करणे, अनियमितता आणि नियमांचे भंग यांसारखी बेकायदेशीर कृत्ये केली होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, बँकांनी ज्या उद्देशासाठी फंड रिलीज केला होता त्यासाठी न वापरता तो फंड अन्य काही कारणांसाठी वापरत होते.

- Advertisement -

नेमकी ही कंपनी काय आहे?

ABG शिपयार्ड लिमिटेड ही खाजगी क्षेत्रातील Ship Building कंपनी आहे. कंपनी बल्क कॅरियर्स, डेक बार्जेस, इंटरसेप्टर, बोट्स, अँकर हँडलिंग सप्लाय शिप, टग्स आणि ऑफशोर वेसेल्स बनवते. कंपनी भारतात व्यावसायिक आणि सरकारी ग्राहकांना सेवा देते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -