घरअर्थजगतअर्थव्यवेस्थेत वाढ करायची असेल तर लोकांच्या खिशात पैसे द्या - अभिजीत बॅनर्जी

अर्थव्यवेस्थेत वाढ करायची असेल तर लोकांच्या खिशात पैसे द्या – अभिजीत बॅनर्जी

Subscribe

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर लोकांच्या खिशात पैसे द्यावे लागती. यासाठी सरकारला नव्या नोटा छापाव्या लागतील, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी दिला आहे. सध्याचे केंद्र सरकार महागाईबद्दल खूप घाबरतंय. परंतु महागाईची चिंता करण्याची ही वेळ नाही. वाढत्या महागाईमुळे पैसेही लोकांच्या खिशामध्ये येतात. यावेळी मागणीतील कमतरता दूर करण्यासाठी सरकारने नवीन नोटा छापून अर्थव्यवस्थेतील तरलता वाढवावी, असं बॅनर्जी म्हणाले.

अभिजीत बॅनर्जी यांनी ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या वेळी त्यांनी नव्या नोटा छापण्यासंदर्भात सल्ला दिला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नव्या नोटा छापण्याचा सल्ला दिला आहे. पी. चिदंबरम यांच्या मताशी मी सहमत आहे, असं बॅनर्जी म्हणाले. मी स्वत: अनेक वेळा सरकारला हा सल्ला दिला आहे. २०१६ पासून देशात मागणी कमी होत आहे. जर मागणी वाढवायची असेल तर नवीन नोटा छापल्या पाहिजेत. भारत सरकार असं न करण्याची दोन कारणे असल्याचे दिसून येते – पहिलं म्हणजे सरकारला महागाईची भीती वाटते. राजकीयदृष्ट्या महागाई धोकादायक असली तरी आर्थिक दृष्टीकोनातून थोड्या महागाईचा फायदा भारतासारख्या देशासाठी फायदेशीर आहे. अमेरिका आणि युरोपमधील देशांमधील सरकार नवीन चलन नोटा उघडपणे छापत आहेत. आतापर्यंत तिथे कोणतंही मोठं संकट घडलेलं नाही.

- Advertisement -

दुसरं कारण – आम्हाला बाँड रेटिंग एजन्सीची खूप भीती वाटते, परंतु यावेळी स्टँडर्ड अँड पुअर्सने देखील सांगितलं की आम्ही अधिक खर्च करावा. बहुतेक बँका महागाईबद्दल खूपच चिंतीत आहेत, असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -