घरटेक-वेक'हे' आहेत भारताचे व्हॉटसअॅप प्रमुख

‘हे’ आहेत भारताचे व्हॉटसअॅप प्रमुख

Subscribe

अभिजीत बोस हे Ezetap मोबाईल सोल्युशनचे संस्थापक आहेत. या आधी त्यांनी ngpay, intuit,oracle and siebel या कंपन्यांचा अनुभव आहे.

व्हॉसअॅपवर मेसेजमुळे उडणारा गोंधळ थांबवण्यासाठी देशात एक व्हॉटसअॅपप्रमुख नेमा अशी मागणी करण्यात आली होती. आता व्हॉटसअॅपने देशाची ही मागणी पूर्ण केली असून जानेवारीपासून भारतात व्हॉटसअॅपमधील समस्या निवारणासाठी हक्काचा माणूस मिळणार आहे. अभिजीत बोस यांची या जागी वर्णी लागली असून गुडगावमध्ये ते आपली नवी टीम बनवणार आहेत.

हे माहित आहे का? भारतीयांसाठी इन्स्टाग्राम हिंदीतही येणार

 परिचालन अधिकाऱ्यांनी केली घोषणा

व्हॉटसअॅपचे सीओओ मॅट इडेमा यांनी या संदर्भात घोषणा केली असून भारतासाठी व्हॉटसअॅप प्रमुख नेमणे आमच्यासाठी देखील आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. व्हॉटसअॅप युजर्सची संख्या पाहता लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. भारताताही व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील प्रश्न समजून घेण्यासही मदत होईल असे ते म्हणाले.

- Advertisement -
वाचा- व्हॉटसअॅप सीईओचा मुंबई दौरा 

कोण आहेत अभिजीत बोस ?

अभिजीत बोस हे Ezetap मोबाईल सोल्युशनचे संस्थापक आहेत. या आधी त्यांनी ngpay, intuit,oracle and siebel या कंपन्यांचा अनुभव आहे. त्यांना या क्षेत्राचा २० वर्षांचा अनुभव आहे.

या आधी नेमले तक्रार अधिकारी

तक्रार अधिकारी या पदासाठी कोमल लहीरीची वर्णी लागली आहे. ज्या व्हॉटसअॅपच्या वरिष्ठ संचालक आहेत. ज्या युएसमध्ये असतात. त्यांची या पदावर ऑगस्टच्या शेवटाला या पदावर नेमणूक करण्यात आली. लहीरी यांना लिंक्ड इनवर तक्रार करता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या अॅपमधून तसेच मेलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवू शकणार आहात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -