घरताज्या घडामोडीबंगालमध्ये काँग्रेसकडून भाजपला मदत.., अभिषेक बॅनर्जींचा विरोधी पक्षावर हल्लाबोल

बंगालमध्ये काँग्रेसकडून भाजपला मदत.., अभिषेक बॅनर्जींचा विरोधी पक्षावर हल्लाबोल

Subscribe

देशात आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. एकीकडे विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची कसरत सुरू असताना दुसरीकडे प्रादेशिक पक्षांनीही आपला पाया अधिक भक्कम करण्यासाठी अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरूवात केली आहे. यासाठी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमल काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे सुद्धा जनसंयोग यात्रेला निघाले आहेत. ही यात्रा इटाहार, उत्तर दिनाजपूर येथे पोहोचली आहे. ही यात्रा इटाहारमध्ये पोहोचल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी येथील सभेला संबोधित केले. यावेळी संबोधत करताना त्यांनी बंगालमधील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. बंगालमध्ये काँग्रेसकडून भाजपला मदत केली जात असून ममता बॅनर्जीचं भाजपला रोखू शकतात.

हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. परंतु विजय मिळवल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एसपीजी सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत घट केली नव्हती. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हा केंद्र सरकारला एलपीजी सिलिंडर आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास भाग पाडले होते.

- Advertisement -

मतदारांनी मुलभूत गरजा लक्षात घेऊन आपल्या लोकप्रतिनिधींना मतदान केले पाहिजे. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. जेव्हा टीएमसी नेत्यांना केंद्रीय एजन्सींनी बोलावले किंवा अटक केली. तेव्हा ते खूप आक्रमक झाले होते, असं बॅनर्जी म्हणाले.

जेव्हा केंद्रीय यंत्रणांनी काँग्रेस नेत्यांना बोलावले तेव्हा त्यांनी त्यांची कसून चौकशीला सुरूवात केली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला. ईडी पश्चिम बंगालमध्ये चांगले काम करत आहे आणि दिल्लीत चुकीचे काम करत आहे, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.

- Advertisement -

भाजपविरोधात लढण्याची चर्चा आहे. परंतु बंगालमध्ये याउलट चित्र दिसतंय. आम्हाला विरोध करण्यासाठी ते भाजप आणि डाव्या पक्षांशी हातमिळवणी करत आहेत. फक्त टीएमसीच भगवा पक्षाशी सामना करू शकते, असेही बॅनर्जी म्हणाले.


हेही वाचा : ‘द केरळ स्टोरी…’, महिलांचे धर्मांतर केल्याचे पुरावे द्या; थरूर यांचे थेट आव्हान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -