घरCORONA UPDATEभारतात १८ वर्षावरील सर्वांना लस, नोंदणीच्या ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो ?

भारतात १८ वर्षावरील सर्वांना लस, नोंदणीच्या ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो ?

Subscribe

देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांना आता कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने जाहीर केला. यामुळे येत्या १ मे २०२१ पासून १६ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांसह महत्त्वपूर्ण बैठक घेत हा निर्णय जाहीर केला. सरकारी रुग्णालयांमध्ये १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत असेल मात्र खासगी रुग्णालांमध्ये तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहे परंतु लस नोंदणीसाठी तुम्हाला CoWIN ऍपवर रजिस्ट्रेशन करत खालील ५ सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे.

रेजिस्ट्रेशनच्या ५ सोप्या स्टेप्स

१) सर्वात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये cowin.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

- Advertisement -

२) त्यानंतर Register/ Sign In yourself येथे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर भरा.

३) यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर टाकून रेजिस्टेशन करा.

- Advertisement -

४) रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस, वेळ ठरवू शकता.

५) यानंतर तुम्ही हॉस्पीटलमध्ये जाऊन लस घेऊ शकता.

लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला रेफ्रन्स आयडी मिळेल. त्यामाध्यमातून तुम्ही लस घेतल्याचे सर्टिफिकेट ऑनलाईन मिळवू शकता.

रेजिस्ट्रेशनवेळी तुमच्या खालीलपैकी एक डॉक्युमेंट आवश्यक

१) आधारकार्ड

२) मतदानकार्ड

३) पॅनकार्ड

४) ड्रायव्हिंग लायसेन्स

५) हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड

६) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार कार्ड

७) पासपोर्ट

८) बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक

९) सर्विस आयडेन्टी कार्ड (केंद्रीय/राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले)

कोरोना लसीकरण वितरणावरील अनेक निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत. त्यामुळे लस निर्मिती कंपन्या 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला करतील आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि ऑपन मार्केटमध्ये करु शकणार आहेत. देशातीला वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल उचलल्यातचे म्हटले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -