Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ABP C Voter Opinion Poll : कर्नाटकात सत्तापालट! काँग्रेस बाजी मारणार?

ABP C Voter Opinion Poll : कर्नाटकात सत्तापालट! काँग्रेस बाजी मारणार?

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वृत्तवाहिन्यांनी या निवडणुकीबाबत ओपिनिअन पोल देखील जारी केले आहेत. एबीपी या वृत्तवाहिनीने सी-व्होटरच्या सहकार्याने घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार, यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

एबीपी – सी व्होटर ओपिनियन पोलनुसार (ABP C Voter Opinion Poll), यावेळी कर्नाटकमध्ये भाजपाला विधानसभेच्या 68 ते 80 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राज्यात काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. कर्नाटकात काँग्रेसला 115 ते 127 जागा मिळू शकतात. तर, कुमारस्वामी यांच्या जेडीएसला 23 ते 35 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलमध्ये इतर पक्षांनाही शून्य ते दोनच्या दरम्यान जागा मिळण्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

एबीपी – सी व्होटर ओपिनियन पोलनुसार, यावेळी कर्नाटकमध्ये भाजपला विधानसभेच्या 68 ते 80 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. कर्नाटकात काँग्रेसला 115 ते 127 जागा मिळू शकतात तर कुमारस्वामी यांच्या जेडीएसला 23 ते 35 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलमध्ये इतर पक्षांनाही शून्य ते दोनच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 104 तर, काँग्रेसने 78 जागा जिंकल्या होत्या. कुमारस्वामी यांचा जेडीएस 37 जागांसह राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. कर्नाटकात बसपा आणि केपीजेपीला प्रत्येकी एक जागा आणि एक अपक्ष विजयी झाला होता.

- Advertisement -

ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला सर्वाधिक व्होट शेअर
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाला कर्नाटकमध्ये 35 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्होट शेअरबाबत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील एकूण मतांपैकी 40 टक्के मते काँग्रेसला मिळू शकतात. कुमारस्वामी यांच्या जेडीएसला 18 टक्के तर इतर पक्षांना 7 टक्के मते मिळण्याची अंदाज आहे.

हेही वाचा – अदानींवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे भाजपनं षडयंत्र रचलं, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य

- Advertisment -