Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश गाड्यांमधील एसी-३ इकॉनॉमीचे तिकीट झाले स्वस्त; प्री-बुकिंगमधील अतिरिक्त पैसे करणार परत

गाड्यांमधील एसी-३ इकॉनॉमीचे तिकीट झाले स्वस्त; प्री-बुकिंगमधील अतिरिक्त पैसे करणार परत

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एसी-3 इकॉनॉमी क्लासचे (AC-3 Economy Class) भाडे स्वस्त केले आहे. एसी-3च्या तुलनेत एसी-3 इकॉनॉमी क्लासचे भाडे आता सहा ते सात टक्क्यांनी कमी असेल. यासोबतच बेडिंग रोलची व्यवस्थाही पूर्वीप्रमाणेच लागू होईल. हा निर्णय बुधवारपासून लागू झाला आहे.

रेल्वे बोर्डाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, जुनी व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रवाशांनी ऑनलाइन आणि काउंटरवर तिकीट बुक केले आहे, त्यांना प्री-बुक केलेल्या तिकिटांसाठी अतिरिक्त रकमेचा परतावा दिला जाईल. नवीन आदेशानुसार इकॉनॉमी क्लासचे भाडे सामान्य एसी-3पेक्षा कमी करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

गेल्या वर्षी रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये एसी 3 इकॉनॉमी कोच आणि एसी 3 कोचचे भाडे समान करण्यात आले होते. पण आता नव्या परिपत्रकानुसार, भाड्यात कपात करण्याव्यतिरिक्त, इकॉनॉमी कोचमध्ये ब्लँकेट आणि चादरी देण्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

वास्तविक इकॉनॉमी एसी-3 कोच ही स्वस्त वातानुकूलित रेल्वेप्रवास सेवा आहे. स्लीपर क्लासच्या प्रवाशांना ‘सर्वोत्तम आणि स्वस्त एसी प्रवास’ सुविधा देण्यासाठी इकॉनॉमी एसी-3 कोच सुरू करण्यात आले. या डब्यांचे भाडे सामान्य एसी-3 सेवेपेक्षा 6-7 टक्के कमी आहे. एसी-3 कोचमध्ये बर्थची संख्या 72 आहे, तर एसी-3 इकॉनॉमीमध्ये बर्थची संख्या 80 आहे. कारण AC-3 इकॉनॉमी कोचमधील बर्थ रुंदी AC-3 कोचच्या तुलनेत थोडी कमी आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

भाडे कमी करणे हे देखील रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. भाडे कमी असल्याने रेल्वेला पहिल्या वर्षी इकॉनॉमी एसी-3 कोचद्वारे 231 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. केवळ एप्रिल-ऑगस्ट 2022 कालावधित या इकॉनॉमी कोचमधून 15 लाख लोकांनी प्रवास केला आणि त्यातून रेल्वेने 177 कोटी रुपये कमावले. इकॉनॉमी एसी-3 कोच सुरू केल्याने सामान्य एसी-3 वर्गाच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही.

- Advertisment -