घरअर्थसंकल्प २०२२Accenture मध्ये १९ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, खर्च कमी करण्यासाठी कंपनीचा निर्णय

Accenture मध्ये १९ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, खर्च कमी करण्यासाठी कंपनीचा निर्णय

Subscribe

नवी दिल्ली – जागतिक आर्थिक मंदीचा फटका जगभरातील सर्वंच कंपन्यांवर होत आहे. ई-कॉमर्स, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी कर्माचारी कपात केल्यानंतर आता आयटी क्षेत्रातील Accenture नेही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. Accenture ने १९ हजार कर्मचारी कपात होणार असल्याचं अंदाजित केलं आहे.

महागाई, वाढते व्याजदर आणि मागणीतील मंदीमुळे आयटी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. पुढच्या १८ महिन्यांत १९ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. जुली स्वीट, चेअर आणि सीईओ, Accenture, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आर्थिक वर्ष 2024 आणि त्यापुढील आमच्या व्यवसायात आणि आमच्या लोकांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवत पुढेही लक्षणीय वाढीच्या संधी मिळवण्यासाठी आमचे खर्च कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत.”

- Advertisement -

हेही वाचा – टाटा समूहाने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दिला व्हिआरएसचा पर्याय

या कंपनीत २८ फेब्रुवारीपर्यंत ७ लाख ३८ हजार कर्मचारी आहेत. वर्षभरापूर्वी हाच आकडा ६ लाख ९९ हजार होता. म्हणजेच वर्षभरात जवळपास ३८ हजार कर्मचाऱ्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ३ लाख भारतीय कर्मचारी आहेत. त्यामुळे, एकीकडे कर्मचारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू असतानाच या कंपनीने अचानक कपातीचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे.

- Advertisement -

Accenture ने आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत $15.8 अब्ज कमाईची नोंद झाली आहे. कंपनीने वार्षिक महसूल अंदाज कमी केला आहे. पूर्वी या कंपनीचा महसूल वाढीचा अंदाज ८ ते ११ टक्के होता. मात्र, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये महसूल वाढीचा अंदाज ८ ते १० टक्के आहे. त्यामुळे कंपनीचा खर्च कमी करून महसूल वाढवण्याकरता कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -