Homeदेश-विदेशAccident : पुंछ भागात लष्कराचे वाहन 350 फूट दरीत कोसळले; 5 जवानांचा...

Accident : पुंछ भागात लष्कराचे वाहन 350 फूट दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, 3 जखमी

Subscribe

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे मंगळवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना झाली. येथे भारतीय लष्कराचे एक वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत पाच जवानांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ही घटना पुंंछ जिल्ह्यातील मेंढर येथील बलनोई येथे घडली आहे. मदत कार्याला सुरुवात झाली असून भारतीय लष्कराचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. दरीत कोसळलेल्या वाहनात 8 जवान होते.

लष्कराचे वाहन हे नीलम मुख्यालयाहून बलनोई घोरा पोस्ट येथे जात होते. घोरा पोस्ट येथे वाहन पोहचत असतानाच ही दुर्घटना झाली. अपघाताची माहिती 11 MLI च्या QRT पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ मतद आणि बचाव कार्याला सुरुवात केली.