हैदराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी भीषण आग लागली. इमारतीमध्ये असलेल्या एका गोदामाला ही आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की अनेकांना त्यातून सुटण्याची संधीही मिळाली नाही. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या तळमजल्यावरील एका गोदामात अनेक रसायने ठेवण्यात आली होती. याच गोदामात एका कारची दुरुस्तीही सुरू होती. या रसायनाला ठिणगी पडल्याने आग लागल्याचे प्राथमिक तपासामधून समोर आले आहे. ही आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आग संपूर्ण खोलीत आणि अपार्टमेंटमध्ये पसरली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर , ३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णायलात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर बचावकार्य सुरूच आहे. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमल दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवून इमारतीतील लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्तन सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. या घटनेच्या समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अग्निशमन दलाचे जवान इमारतीत अडकलेल्या महिला आणि मुलांना खिडक्यांवर शिडी लावून बाहेर काढताना दिसत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार केमिकलमुळे ही आग लागली आहे. मात्र ही आग पाण्याने विझवता आली नाही असं सांगितलं. सकाळी ९.३५ च्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमल दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या आगीचे नक्की कारण काय आहे हे अजून पर्यंत सांगता येत नाही.
याआधी देखिल हैदराबादमधील कोठापेट येथील ललिता हॉस्पिटलजवळील एका दुकानाला आग लागली, मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते.
यापूर्वी १८ मार्च रोजी हैदराबामध्ये भीषण आग लागली होती. कालापठार येथील अन्सारी रोडवरील प्लास्टिक कचरा गोदामात ही आगीची घटना घडली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेच्या सुमारे 39 तासांपूर्वी हैदराबादमधील सिकंदराबाद येथील एका कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता.