हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने 4 पर्यटकांचा मृत्यू, 3 जखमी

accident in kullu 4 tourists died 3 injured
हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने 4 पर्यटकांचा मृत्यू, 3 जखमी

हिमाचल प्रदेशातील कल्लू जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. बंजार येथील घियागीजवळ दिल्लीहून आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामुळे कार सुमारे 200 मीटर खोल घियागी दरीत कोसळली, ज्यात 4 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झालेत. या मृतांमध्ये एका महिलेसह तीन पर्यटकांचा समावेश आहे.

रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान स्थानिकांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना तात्काळ पोलिसांना पाचारण केले, पोलिसांनी घटनास्थळ गाठून 2 जखमी पर्यटकांना उपचारांसाठी बंजार येथे नेले. आस्था भंडारी (26) आणि साक्षी (27) अशी जखमींची नावे आहेत. या दिल्लीच्या रहिवासी असून त्यांच्यावर बंजार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांचे पथक सध्या मृतदेह बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. मात्र या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याप्रकरणा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. हा अपघात रविवारी रात्रीच्या वेळी झाल्याचे समजते. सिरमौर जिल्ह्यातील हरिपुरधरजवळ पर्यटकांची कार खोल दरीत पडल्याने चार जण जखमी झाले. दादहू-संग्रा-हरिपूरधर मार्गावर डूम का बागजवळ हा अपघात झाला. 


राज्यातील आगामी मनपा निवडणुकीत एक परिवार, एक तिकीट; नाना पटोलेंची घोषणा