घरदेश-विदेशउत्तर प्रदेशमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; मुलाला कारने नेले फरफटत

उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; मुलाला कारने नेले फरफटत

Subscribe

केतन (१६) असे अपघात झालेल्या मुलाचे नाव आहे. कोतवाली शहरात ही घटना घडली. केतन त्याच्या मित्रांसोबत सायकलने कोचिंगसाठी जात होता. त्याचवेळी एका कारने त्याला धडक दिली. केतन चाकात अडकला. कारने केतनला एक किमी अंतर फरफरट नेले. हा थरार स्थानिकांनी बघितला. स्थानिक नागरिकांना गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने अधिकच वेगाने गाडी चालवली. अखेर शहरातील मुख्य बाजारपेठ सिनेमा रोडवर नागरिकांना चालकाल पडकले.

उत्तर प्रदेशः कोचिंगसाठी सायकलवर जात असलेल्या मुलाला एका कारने सुमारे एक किमीपर्यंत फरफट नेल्याची घटना उत्तर प्रदेश येथे घडली आहे. या मुलाला उपचाराठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालकालाही अटक करण्यात आली आहे.

केतन (१६) असे अपघात झालेल्या मुलाचे नाव आहे. कोतवाली शहरात ही घटना घडली. केतन त्याच्या मित्रांसोबत सायकलने कोचिंगसाठी जात होता. त्याचवेळी एका कारने त्याला धडक दिली. केतन चाकात अडकला. कारने केतनला एक किमी अंतर फरफरट नेले. हा थरार स्थानिकांनी बघितला. स्थानिक नागरिकांना गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने अधिकच वेगाने गाडी चालवली. अखेर शहरातील मुख्य बाजारपेठ सिनेमा रोडवर नागरिकांना चालकाल पडकले.

- Advertisement -

संतप्त जमावाने गाडीची तोडफोड करत ती खाली पाडली. चालकाला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. केतनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस याचा अधिक तपासात करत आहेत.

गेल्या आठवड्यात तरुणीला कारने फरफटत नेलयाची घटना दिल्ली येथे घडली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दिल्लीतील कांजवाला येथे बोलेरो जीपने एका तरुणीच्या स्कुटीला धडक देऊन तिला खाली पाडले. जीपला अडकलेल्या या तरुणीला १३ किमी फरफटत नेले. यात तरुणीचा मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघातात तरुणीच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. या तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी तपास करत तरुणीला धडक देणाऱ्या जीपमधील पाच आरोपींना अटक केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. महिला आयोगानेही याप्रकरणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अपघातातील मृत तरुणी अंजली सिंह न्यू इअर पार्टीवरून घरी परतत असताना तिच्या स्कूटीवर मागे एक मुलगी बसली होती. निधी असे त्या मुलीचे नाव आहे. कारने धडक देताच मृत तरुणी अंजली आणि तिची मैत्रीण निधी खाली कोसळली, स्कूटीवरून खाली पडताच अंजली कारच्या चाकात अडकली, कार अंजलीला फरफटत घेऊन जात असल्याचे पाहून तिची मैत्रीण बिथरली आणि ती घटनास्थळावरून घरी निघून गेली, असे पोलीस तपासात उघड झाले.

.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -