घरदेश-विदेशपूर्वांचल द्रुतगती मार्गावर दोन डबलडेकर बसचा भीषण अपघात; अपघातात ८ जणांचा मृत्यू

पूर्वांचल द्रुतगती मार्गावर दोन डबलडेकर बसचा भीषण अपघात; अपघातात ८ जणांचा मृत्यू

Subscribe

अपघातात आठ प्रवासी जागीच ठार झाले. तर जखमी झालेलया प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेस वेवरील बाराबंकी(barabanki) येथे सोमवारी सकाळी दोन बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ प्रवासी मृत्युमुखी पडले तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डबल डेकर बसला मागून भरधाव येणाऱ्या बसची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ प्रवासी जागीच ठार झाले, तर जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जखमी झालेल्या प्रवाशांवर लखनऊ(lucknow) मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा –  दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती

- Advertisement -

लोणीकेत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ ही अपघाताची दुर्घटना घडली. या दोन्ही डबल डेकर बस बिहारमधील सीतामढी आणि सपौल या भागातून दिल्लीत जात होत्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली. एएसपी मनोज पांडे यांच्यासह पोलीस आणि बचाव पथक यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना सीएचसी हैदरगड येथे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून ‘ध्वज’ संहितेत बदल

मागील महिन्यातही झाला होता अपघात

याआधीही पूर्वांचल द्रुतगती मार्गावर एक अपघात झाला होता. मागच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये १५ तारखेला सुलतानपूर(sultanpur) परिसरात पूर्वांचल द्रुतगती मार्गावर कार आणि टँकरची धडक झाली होती. या अपघातातही चार जणांचा मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झालेले होते आणि त्या नंतर महिनाभराच्या दरम्यान पूर्वांचल द्रुतगती (express way) मार्गावर बसचा झालेला हा दुसरा भीषण अपघात आहे.

हे ही वाचा – अमेरिकेच्या ‘त्या’ क्षेपणास्त्र प्रणालीपेक्षाही S-400 आहे शक्तिशाली, जाणून घ्या खासियत

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -