Homeदेश-विदेशBoundary Dispute : मृतदेह देखील जेव्हा हद्दीच्या वादात सापडतो...वाचा काय आहे प्रकरण

Boundary Dispute : मृतदेह देखील जेव्हा हद्दीच्या वादात सापडतो…वाचा काय आहे प्रकरण

Subscribe

दोन राज्यांमध्येच हद्दीचा वाद पेटला आणि याचा फटका चक्क एका मृतदेहाला बसला. संध्याकाळी 7 वाजता अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रात्री 11 वाजता हलवण्यात आला.

नवी दिल्ली : रेल्वे आणि रस्ते पोलिसांचे हद्दीचे वाद आपण नेहमीच बघत, ऐकत असतो. यामुळे अनेकदा गुन्हे उशीरा दाखल होतात, पण हे वाद काही संपत नाहीत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. इथे दोन यंत्रणांचा वाद नाही तर दोन राज्यांमध्येच हद्दीचा वाद पेटला आणि याचा फटका चक्क एका मृतदेहाला बसला. संध्याकाळी 7 वाजता अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रात्री 11 वाजता हलवण्यात आला. (accident victims body lay on the road for 4 hours mp and up police said this is not our job)

रस्ते अपघातात एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पण नंतरही या मृतदेहाचा प्रवास हलाखीचा राहिला. कारण, हा मृतदेह दोन राज्यांच्या हद्दीच्या वादात सापडला. यामुळे या पीडित व्यक्तीचा मृतदेह चार तासांपेक्षाही जास्त काळ रस्त्यावरच पडून होता. स्थानिक तसेच नातेवाईकांनी निदर्शने केल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा – Mukesh Chandrakar : क्रूरतेचा कळस; ठार मारण्यापूर्वी मुकेश चंद्राकारचे केले हाल; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो

हा वाद उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या अधिकारांवरून रंगला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका 27 वर्षीय व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यानंतर खरं नाट्य सुरू झालं. या मृतदेहावरून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पोलिसांमध्ये हद्दीचा वाद रंगला. या दोन राज्यांमध्ये रंगलेल्या वादामुळे चार तासांपेक्षा अधिक काळ हा मृतदेह रस्त्यावरच पडून होता.

मृत व्यक्तीचे नाव राहुल अहिरवार असून ते घरून दिल्लीला जायला निघाले होते. रस्ता ओलांडत असताना एका गाडीने त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर लगेचच लोक गोळा झाले आणि त्यांनी मध्य प्रदेशातील हरपालपूर पोलीस ठाण्याला या अपघाताची सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा अपघात उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील महोबकंठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगत सरळ हात वर केले.

मध्य प्रदेश पोलीस निघून गेल्याने स्थानिकांनी उत्तर प्रदेश पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी देखील टाळाटाळ करत हे मध्य प्रदेश पोलिसांचे काम असल्याचे सांगितले. पोलिसांच्या या टोलवाटोलवीनंतर स्थानिकांनी रस्त्यावरच आंदोलन करण्यास सुरुवात केली. तेव्हाही मृतदेह तिथेच पडून होता. शेवटी अपघाता नंतर चार तासांनी मध्य प्रदेश पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. यानंतर स्थानिकांनी हा रस्ता रिकामा केला आणि वाहतूक सुरू झाली.

हेही वाचा – India Condemns Pakistan Airstike : नाचता येईना…अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या हल्ल्यांवरून भारत भडकला

राहुल अहिरवारचे नातेवाईक रामदीन म्हणाले की, माझ्या चुलत भावाचा या अपघातात मृत्यू झाला. हा भाग मध्यप्रेदशात येतो. पण, तरीही हा मृतदेह बराच काळ रस्त्यावर असाच पडून होता. कारण, कोणीही याची जबाबदारी घेण्यात तयार नव्हते. मध्य प्रदेशातील एका पोलिसाने, हे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगत आमच्यावर आगपाखड केली. आम्हाला लवकरात लवकर या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे होते, त्यामुळे आम्ही लवकर अंत्यसंस्कार करू शकू. ज्या वाहनाने धडक दिली, त्या वाहनाची ओळख पटावी अशी आमची मागणी आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या राहुलचे नुकतेच लग्न झाले आहे. आणि तो मजुरीसाठी दिल्लीला जात होता. तेव्हाच त्याचा अपघात होऊन मृत्यू झाला.