अस्थी विसर्जन करुन परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात, ६ जण ठार

accidents in trucks and pickup vans 6 killed and 17 injured
अस्थी विसर्जन करुन परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात, ६ जण ठार

अस्थी विसर्जन करुन घरी परतणाऱ्या कुटुंबीयांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली आहे. अपघातामध्ये १७ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हरियाणातील जिंदमध्ये ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये ६ जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील लोकांचा समावेश आहे. अस्थी विसर्जन करुन आपल्या घराकडे कुटुंब रवाना झाले होते. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर अस्थींचे विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला आले होते. परंतु गाडीचा चालक झोपेत असल्यामुळे भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हरियाणाच्या जिंद-चंदीगड रस्त्यावर कंडेला गावाजवळ सकाळच्या वेळी अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअपची धडक इतकी जोरदार होती की, या अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकण्यास आला होता. अपघातामधील नागरिक नारनौंद गावातील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच डायल ११२ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना जवळच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी ६ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तर १७ जणांवर उपचार सुरु करण्यात आले आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्या एका एकाने दिलेल्या माहितीनुसार नारनौड गावातील रहिवासी प्यारे लाल यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे अस्थी विसर्ज करण्यासाठी कुटुंब हरिद्वारला आले होते. पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये पिकअपच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.


हेही वाचा : karnataka Road Accident : कर्नाटकच्या हुबळीमध्ये भीषण रस्ते अपघात; 7 जणांचा मृत्यू, 27 जखमी