घरदेश-विदेशभारतीयांचे सोन प्रेम जगजाहीर, 'या' देशांना ही टाकले मागे

भारतीयांचे सोन प्रेम जगजाहीर, ‘या’ देशांना ही टाकले मागे

Subscribe

भारतीयांचे सोन्यावरील प्रेम लपलेले नाही. ते पुन्हा एकाद सिद्ध झाले आहे. गोल्ड कोन्सिलने नुकताच आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार भारतीयांकडे जगातील एक टक्के सोने आहे. आकडेवारी नुसारा 21733 टन सोने भारतात आहे. भारत जरी विकसनशील देश मानला जात असला तरी भारतीयांकडे असणाऱ्या सोन्याचा विचार करता भारत जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणत भारतात सोने असल्याची अनेक कारणे आहेत. एवढे सोने असल्यामागची अनके कारणे आहेत. भारतात विविध सण परंपरा आणि लग्न समारंभात सोने विकत घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे भारतात अनेकजण विविध कारणांनी सोन्याचे दागिने खरेदी करत असतात. बदलत्या काळातही ही सोन्याचे आकर्षण आजही कमी झाले नसल्याने भारतीय महिलांजवळ हजारो कोटी रुपयांच्या सोन्याची साठवणूक झाली असल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

भारत जगातील सात देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही पुढे असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिला आहे. या सातदेशात अमेरिका (8133), जर्मनी (3382), इटली (2451), फ्रान्स (2436), रशिया (2298), चीन (1948) सिंगापूर (127) टन इतका सोन्याचा साठा आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -