सर्वाधिक श्रीमंत पक्ष भाजप, काँग्रेसपेक्षा बसपाची संपत्ती जास्त, ADR अहवाल जाहीर

according to adr report richest party BJP BSP has more wealth than Congress
सर्वाधिक श्रीमंत पक्ष भाजप, काँग्रेसपेक्षा बसपाची संपत्ती जास्त, ADR अहवाल जाहीर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरकडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात सर्व राजकीय पक्षांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. एडीआर अहवालानुसार भाजपकडे सर्वाधिक संपत्ति आहे. भाजपने 4,847.78 करोड रुपयांची घोषणा केली असून ही संपत्ति इतर राजकीय पक्षांपेक्षा सर्वाधिक आहे. यानंतर मायावतींच्या बसपाची 698.33 करोड तर काँग्रेसची 588.16 करोड संपत्ती आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने 2019-20 मध्ये राष्ट्रीय आणि राज्यातील पक्षांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

निवडणूक सुधारणा वकिल संस्था एडीआरच्या विश्लेषणानुसार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सात राष्ट्रीय आणि 44 प्रादेशिक पक्षांनी एकूण मालमत्ता अनुक्रमे 6,988.57 कोटी रुपये आणि 2,129.38 कोटी रुपये होती. एडीआर रिपोर्टनुसार सात राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती भाजपकडे आहे. जी एकूण संपत्तीच्या 69.37 टक्के आहे. तर बसपाची 9.9 टक्के आहे. तर काँग्रेसची 8.42 टक्के आहे. ४४ प्रादेशिक पक्षांपैकी शीर्ष 10 पक्षांची मालमत्ता 2028.715 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 19-20 मध्ये समाजवादी पक्षाने प्रादेशिक पक्षामध्ये 563 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. टीआरएसची 301.47 रुपये तर एआयएडीएमके 267.61 कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये प्रादेशक पक्षांद्वारे घोषित करण्यात आलेल्या एकूण संपत्तीमध्ये फिक्स्ड डिपॉझिट आणि एफडीआरने 1,639.51 करोड दाखवण्यात आले आहेत. भाजप आणि बसपाने अनुक्रमे 3,253.00 करोड आणि 618.86 करोड रुपये संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून 240.90 कोटी रुपये असल्याची घोषणा केली आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये सपा 434.219 कोटी रुपये, टीआरएस 256.01 कोटी रुपये तर अन्नाद्रमुख 246.90 कोटी रुपये, द्रमुक 162.425 कोटी रुपये, शिवसेना 148.46, बीजद 118.425 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अहवालानुसार, राष्ट्रीय राजकीय पक्षांनी 2019-20 या आर्थिक वर्षात एकूण 74.27 कोटी रुपयांचे दायित्व घोषित केलय. राष्ट्रीय पक्षांनी कर्जाअंतर्गत 4.26 कोटी रुपये आणि इतर दायित्वांतर्गत 70.01 कोटी रुपये जाहीर केले आणि काँग्रेसने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सर्वाधिक एकूण 49.55 कोटी रुपये (66.72 टक्के) जाहीर केले.


हेही वाचा : नोकरदारांसाठी खुशखबर! यंदा पगारात 10 टक्क्यांपेक्षा अधिक पटीने होणार वाढ