घरताज्या घडामोडीदेशात सर्वाधिक हिदूंनी केलंय धर्मांतर, सर्वेक्षणानुसार "या" समाजामध्ये जास्त प्रवेश

देशात सर्वाधिक हिदूंनी केलंय धर्मांतर, सर्वेक्षणानुसार “या” समाजामध्ये जास्त प्रवेश

Subscribe

केवळ अनुसूचित जातीसोबत भेदभाव होत असल्याच्या कारणामुळे धर्मांतरण

उत्तरप्रदेशात धर्मांतरणाच्या आरोपावरुन पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या धर्मांतरणाच्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आले आहे. तर आता एका प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार भारतात धर्मांतरणामध्ये हिंदूच अग्रेसर असल्याची माहिती समोर आली आहे. देशात सर्वाधिक हिंदूंनी धर्मांतर केलं असल्याचं सर्वेक्षणाच्या अहवालात आढळले आहे. धर्मांतरणाच्या बाबतीत सर्वाधिक धर्मांतर हे ख्रिश्चन समाजामध्ये करण्यात आले आहे. प्यू रिसर्च रेंटरने (Pew Research Center) केलेल्या सर्व्हेमध्ये हिंदूंचे आणि इतर धर्मांमधील लोकांचा समावेश करण्यात आला होता.

प्यू रिसर्चच्या सर्व्हेनुसार दाक्षिणात्या भागातील हिंदू धर्मांतील लोकांनी सर्वात जास्त धर्मांतर हे ख्रिश्चन समाजात केलं आहे. फक्त दक्षिण भारतात ख्रिश्चन धर्माचे प्रमाण ७४ टक्के असून भारतातील सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळेच दक्षिण भागात ख्रिश्चन धर्मात जास्त वाढ झाली असल्याचे आढळले आहे. आपण जन्म घेतल्यापासून ख्रिश्चन असल्याचे ६ टक्के लोकांनी सांगितले आहे आणि ७ टक्के लोकांनी ख्रिश्चन सर्व्हेमध्ये आपण ख्रिश्चन असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

धर्मांतरबाबत केलेल्या सर्वेनुसार अशी माहिती मिळाली आहे की, अनुसूचित जाती आणि जमातीतील हिंदू लोकांचे धर्मांतर करण्याकडे अधिक कल आहे. ज्या हिंदू लोकांनी ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला आहे ते बहुतांश हे अनुसूचित जातीतील आहेत यामध्ये १४ टक्के अनुसूचित जमातीचे आहेत. ओबीसी समाजातील लोकांचे ख्रिश्चन धर्म स्विकारण्याचे प्रमाण हे २६ टक्के आहे.

भेदभाव केल्यामुळे धर्मांतर

देशात सर्वाधिक हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे. ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या ४५ टक्के लोकांमध्ये हिंदूच असून केवळ अनुसूचित जातीसोबत भेदभाव होत असल्याच्या कारणामुळे धर्मांतरण केलं असल्याचे कारण समोर आलं आहे. सर्विधिक हिंदूनी धर्मांतर केलं असलं तरी मात्र लोकसंख्येमध्ये फरक पडला नाही आहे. या सर्व्हेत सहभागी झालेल्या ८१.६ टक्के लोकांनी आपण जन्मापासून हिंदू असल्याचे सांगितले आहे तर ८१.७ टक्के लोकांनी सध्या हिंदू आहोते असे सांगितले आहे. ११.२ टक्के लोकांनी जन्म मुस्लीम धर्मात झाला आहे. ख्रिश्चन धर्मातील २.६ टक्के लोकांनी आपण ख्रिश्चन असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

३० हजार नागरिकांचा सहभाग

प्यू रिसर्चने केलेल्या सर्व्हेमध्ये ३० हजार नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. तसेच १७ भाषांमधील या नागरिकांसोबत चर्चा कऱण्यात आली. या चर्चेमध्ये त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरुन माहिती गोळा करण्यात आली होती. हा रिसर्च कोरोना संकटापुर्वी २०१९ ते २०२० मध्ये करण्यात आला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -