घरताज्या घडामोडीafganistan-तालिबान्यांनी तुरुंगातून सोडलेले आरोपी महिला न्यायाधीशांच्या शोधात

afganistan-तालिबान्यांनी तुरुंगातून सोडलेले आरोपी महिला न्यायाधीशांच्या शोधात

Subscribe

महिला स्वातंत्र्यावरच तालिबानने गदा आणली असून सामान्य महिलाच नाही तर जनतेला न्याय देणाऱ्या महिला न्यायाधीशही असुरक्षित असल्याच समोर आलं आहे. 

अफगाणिस्तावर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील नागरिकांच आयुष्यच बदलून गेलं आहे. महिला स्वातंत्र्यावरच तालिबानने गदा आणली असून सामान्य महिलाच नाही तर जनतेला न्याय देणाऱ्या महिला न्यायाधीशही असुरक्षित असल्याच समोर आलं आहे.  ज्या आरोपींना  महिला न्यायाधीशांनी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती ते आरोपी बदला घेण्यासाठी या महिला न्यायाधीशांचा शोध घेत आहेत. यामुळे जीवाच्या भीतीने या महिला न्यायाधीश लपून बसल्या आहेत. अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काबुल शहरावर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी जवळजवळ सर्वच शहरांवर ताबा मिळवत अफगाणिस्तानवर कब्जा केल्याची घोषणा केली . त्यानंतर सर्वप्रथम तुरुंगातील हजारो कैद्यांना सोडून देत तालिबानमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले. पण एका महिलेच्या आदेशामुळे आपल्याला तुरुंगात जावे लागल्याची घटना या आरोपींच्या जिव्हारी लागली आहे. यामुळे काहीही करुन या महिला न्यायाधीशांचा बदला घेण्याचा निर्णय या आरोपींनी घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर हे आरोपी महिला न्यायाधीश  आणि त्यांचे नातेवाईक यांचा शोध घेत आहेत. अफगाणिस्तानमध्ये जवळ जवळ २०० महिला न्यायाधीश आहेत. या महिला न्यायाधीशांना आरोपींनी बघून घेऊ असे धमकीचे पत्र पाठवले असून काहीजण धमकीचे फोनही करत आहेत. यामुळे सर्वच महिला न्यायाधीशांवर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घर सोडून दुसऱ्या शहरात नाव बदलून राहण्याची नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, या घटनेवर तालिबानने महिला न्यायाधीशांना न घाबरण्याचे आवाहन केले असून महिलांनी घरातून बाहेर पडू नये असा हुकुमूच काढला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -