एका धार्मिक नेत्याला मारणार होतो पण…, शिंजो आबेंच्या मारेकऱ्याचा खुलासा

शिंजो आबे यांची काल गोळी झाडून हत्या करण्यात आली. यावेळी मारेकऱ्याला घटना स्थळी पकडण्यात आले. पोलीस चौकशीत मारेकरी तेत्सुया यामागामी ने धक्कादाय खुलासा केला आहे.

SHINZO ABE

शिंजो आबे यांची काल गोळी झाडून हत्या करण्यात आली. यावेळी मारेकऱ्याला घटना स्थळी पकडण्यात आले. पोलीस चौकशीत मारेकरी तेत्सुया यामागामी ने धक्कादाय खुलासा केला आहे. त्यांने मी एका धार्मीक नेत्याला मारणार होतो. शिंजो आबे हे माझे मूळ टार्गेट नव्हते. ऐनवेळी माझा प्लान बदलला, असा धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे.

जपानच्या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आबे यांच्यावर हल्ला करणारा आरोपी एका धार्मिक नेत्याला मारणार होता. या नेत्याने आपल्या आईला फसवल्याचे त्याचे म्हणणे आहे. पण, ऐनवेळी त्याचा विचार बदलला आणि त्याने आबे यांना संपवण्याचे ठरवले. हल्लेखोर ज्या धार्मिक नेत्याची हत्या करणार होता,  त्याच्या संघटनेला आबे यांचे पाठबळ होते.  या रागातून त्याने आबे यांना टार्गेट करण्याचे ठरवले, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. आबे यांच्यावर हल्ला करण्याच्या आधी त्यांच्या प्रचारसभा जिथे जिथे झाल्या, त्या प्रत्येक ठिकाणी मी गेलो होतो, असेही यामागामी याने चौकशीत सांगितले. कुठल्याही राजकीय द्वेषातून हे कृत्य केले नसल्याचे तो म्हणाला.

कोण आहे हल्लेखोर –

आबे यांचा हल्लेखोर जपानी नौदलातील माजी सैनिक आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच्या घरातून अनेक बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.

कसा झाला हल्ला –

जपानचे माजी पंतप्रधान आणि लिबरल डोमेस्टिक पक्षाचे अध्यक्ष शिंजो आबे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शिंजो आबे अचानक खाली कोसळले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तसेच, गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूवेळी ते ६७ वर्षांचे होते. दरम्यान, या हल्ल्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जपानमध्ये रविवारी राज्यसभेच्या निवडणुका आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंजो आबे टोक्योतील नारा शहरात आले होते. तिथे त्यांचे भाषण सुरू असतानाच ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी उपस्थित जमावाला गोळीबाराचा आवाज आला. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.