Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधींवरील कारवाई राजकीय सुडाने; काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

राहुल गांधींवरील कारवाई राजकीय सुडाने; काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

Subscribe

राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून देशभरात भाजपविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या कारवाईनंतर आता काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रसार माध्यमांसमोर मत मांडले.

लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून केलेले बदनामीकारक वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. ज्यामुळे देशभरात आता केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी काँग्रेसचे मत मांडले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, “आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हे होऊ दिले जात नाहीये. राहुल गांधी सर्व विषयांवर न घाबरता आपले मत व्यक्त करत आहेत. त्यांनी देशभरात घेतलेल्या भारत जोडो यात्रेची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. ही कारवाई आधी राजकीय हेतूने झाली असून नंतर ती कायद्याने करण्यात आली आहे. न घाबरता बोलणे हे भजनी सर्वात मोठी भीती आहे. अनेक प्रकरणांमध्ये या सरकारने अशाच पद्धतीने कारवाई केली आहे. संसदेच्या आत आणि बाहेर राहुल गांधी यांनी बिनधास्तपणे आपले मत मांडले आहे. चीनला क्लीनचिट देणे, जीएसटी, नोटबंदी अशा मुद्द्यांवर जे बोलतील, त्यांचा आवाज दाबण्यात येतो. बनावटी राष्ट्रवादाच्या नावावर भीती दाखवण्यात येत. लोकशाही असलेल्या देशात असे कधी पाहिले गेले नाही. जिथे तुम्ही बोलाल तिथे तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील.”

- Advertisement -

तर पुढे बोलताना सिंघवी म्हणाले की, देशातील अनेक ज्वलंत आणि महत्वाच्या प्रश्नांवरून दुर्लक्ष व्हावे, यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे संविधानाच्या कलम १०३ अंतर्गत खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय हा राष्ट्रपती घेत असतात. त्यात देखील आधी राष्ट्रपती निवडणूक आयोगाकडून सूचना घेतात. त्यानंतर हा निर्णय घेतला जातो. पण या प्रकरणात ही प्रक्रिया पाळली गेलेली नाही. तसेच याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रियेत या शिक्षेला स्थगिती मिळेल, असा विश्वास देखील सिंघवी यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, राहुल गांधी आणि काँग्रेसचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले


हेही वाचा – खासदारकी रद्द झाल्यानंतर काॅंग्रेसची पहिली प्रतिक्रिया; सत्य आणि लोकशाहीसाठी तुरुंगात जायला तयार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -