घरदेश-विदेशसॅनिटरी नॅपकिनद्वारे रचला विश्व विक्रम

सॅनिटरी नॅपकिनद्वारे रचला विश्व विक्रम

Subscribe

मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. १० हजारहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्स वापरून हा रेकॉर्ड बनवण्यात आला आहे.

सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक पाळीयावर सध्या उघडपणे वक्तव्य केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी यावर आधारित एक चित्रपट काढण्यात आला होता. या चित्रपटानंतर या विषयाची चर्चा ही अधिक प्रमाणावर होऊ लागली. सॅनिटरी नॅपकिनचा वापर तर मासिकपाळी दरम्यान केला जातो. मात्र बंगळुरूमध्ये याचा वापर करून नुकताच विश्वविक्रम केला गेला आहे. मासिक पाळीवर जनजागृती करण्यासाठी एका वैद्यकीय परिषदेत हा रेकॉर्ड बनवण्यात आला. या परिषदेत १० हजार १०५ सॅनिटरी नॅपकिन्सची मोठी प्रतिकृती बनवण्यात आली. १ हजार ७८ मीटर लांब ही प्रतिकृती बनवण्यात आली. ही प्रतिकृती बनवण्यासाठी साडे सात तासांचा वेळ लागला. “आपल्या गर्भशयाव्यतिरिक्त अजून काही महत्वाचे नाही.” असे बोधचिन्ह येथे लिहिण्यात आले होते. डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून ही प्रतिकृती तयार केली आहे. याची नोंद गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये केली असल्याचे सांगितल्या जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -