Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश उदयनिधींच्या समर्थनार्थ उतरला अभिनेता कमल हसन; म्हणाला- विचार मांडण्याचा सर्वांना अधिकार

उदयनिधींच्या समर्थनार्थ उतरला अभिनेता कमल हसन; म्हणाला- विचार मांडण्याचा सर्वांना अधिकार

Subscribe

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांचा मुलगा आणि विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्मच्या समाप्तीबाबत मोठे विधान केले होते.

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संपूर्ण देशात वाद पेटला आहे. हा वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. टीकेच्या भाडीमारात मात्र, उदयनिधींच्या समर्थनार्थ एका अभिनेत्यांने उडी घेतली असून, त्यांनी आपले विचार व्यक्त करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे म्हटले आहे. (Actor Kamal Haasan came out in support of Udayanidhi; He said – everyone has the right to express their views)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांचा मुलगा आणि विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्मच्या समाप्तीबाबत मोठे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली असून, अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तर सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचले आहे. यादरम्यानच आता उदयनिधी स्टॅलीन यांच्या समर्थनार्थ दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी उडी मारली असून, त्यांनी उदयनिधींचे समर्थन केले आहे.

ट्वीटवर पोस्ट करत केले समर्थन

- Advertisement -

अभिनेता कमल हसन यांनी गुरुवारी ट्वीट करत उदयनिधी यांचे समर्थन केले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, एका चांगल्या लोकशाहीची ओळख ही त्या देशातील नागरिकांच्या विरोधकांतून आणि नेहमीच विविध विषयांवर आपले मत मांडण्यातून होते. यापूर्वीही इतिहासाने आपल्याला शिकवले की, योग्य प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला महत्वपूर्ण उत्तरे मिळाली आहेत. ते आपल्या समाजाला चांगले बनविण्यासाठी योग्य ठरले आहेत. तर उदयनिधी यांना सनातन धर्मावर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही त्यांच्या मताशी असहमत आहात तर त्यांना हिंसेची धमकी देण्याएवजी आणि कायद्याची धमकी देण्याएवजी त्यांना सांगा की सनातन धर्म किती सुंदर आहे. त्यांना याबाबत चर्चा करण्यासाठी निमंत्रीत करा. तामिळनाडू हे राज्य नेहमीच चांगल्या चर्चेसाठी योग्य वातावरणाचे राज्य राहलेले आहे आणि पुढेही राहील. तेव्हा या वादात न पडता हेल्दी चर्चा करा असेही आवाहन त्यांनी या पोस्टमधून केले आहे.

हेही वाचा : UIDAI ‘या’ वर्षाच्या शेवटपर्यंत विनामूल्य आधारकार्ड करा अपडेट

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलीन?

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सनातन धर्मातील जातीभेद आणि इतर प्रथांवर टीका केली. त्यांनी धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. सनातन धर्मामुळे समाजात भेदभाव होत असल्याचे ते म्हणाले होते.

हेही वाचा : नाव बदलण्यासाठी 14 हजार कोटींचा खर्च न करता सरसकट कर्जमाफी करा; सुळे यांचा केंद्राला सल्ला

ए. राजा म्हणाले हा सामाजिक कलंक

उदयनिधी सोबतच द्रमुकचे नेते ए.राजा यांनीही सनातनवर टीका केली होती. त्यांनी सनातन धर्माची एड्सशी तुलना केली पाहिजे, ज्याला सामाजिक कलंक आहे. ते म्हणाले, उदयनिधी स्टॅलिन यांनी डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून नम्रता दाखवली आहे.

- Advertisment -