Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चांद्रयान-3 मोहिमेची अभिनेता प्रकाशराजने उडवली खिल्ली; आता करावा लागतोय ट्रोलर्सच्या 'टोळ्यांचा' सामना

चांद्रयान-3 मोहिमेची अभिनेता प्रकाशराजने उडवली खिल्ली; आता करावा लागतोय ट्रोलर्सच्या ‘टोळ्यांचा’ सामना

Subscribe

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने लोकप्रियता मिळवलेला प्रकाशराज याचे चाहते देशभरात आहेत.

नवी दिल्ली : देशभरातील लोकांना चांद्रयान-3 या मोहिमेचा अभिमान वाटत असताना काही लोक त्याची खिल्ली उडवत आहेत. यामध्ये अभिनेता प्रकाशराज यांचाही समावेश आहे. वास्तविक, प्रकाशराज यांनी ट्वीट करीत चांद्रयान-3 ची पहिली झलक पाहा. या पोस्टसोबतच प्रकाशराज यांनी चंद्र मोहिमेबद्दलचा एक मजेदार फोटोही शेअर केला आहे, ज्यानंतर लोकांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. (Actor Prakashraj mocks Chandrayaan3 mission Now we have to deal with the gangs of trollers)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने लोकप्रियता मिळवलेला प्रकाशराज याचे चाहते देशभरात आहेत. मात्र आपल्या कसदार अभिनयाबरोबरच प्रकाशराज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. अलीकडेच त्याने ट्वीटरवर प्रकाश राज याने एक ट्विट केले आहे. आणि ते आहे चांद्रयान-3 मोहिमेबाबत. त्याने केलेले ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमुळे अभिनेता प्रकाशराज चांगलाच अडकला असून त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. चंद्रयान 3 ची खिल्ली उडवणे अभिनेत्याला चांगलेच महागात पडत आहे.

- Advertisement -

हे लिहले प्रकाशराजने त्याच्या ट्वीटमध्ये

अभिनेता प्रकाशराज याने केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, चांद्रयान-3 ची पहिली झलक पाहा. या पोस्टसोबतच प्रकाश राज यांनी चंद्र मोहिमेबद्दलचा एक मजेदार फोटोही शेअर केला आहे, ज्यानंतर लोक त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा : घडी घडी ड्रामा करते हैं…, Animation filmद्वारे काँग्रेसचे ‘गब्बर सिंग’ मोदींसह भाजपावर शरसंधान

असा घेतला ट्रोलर्सनी प्रकाशराज यांचा समाचार

अभिनेता प्रकाशराज यांनी केलेल्या ट्वीटनंतर ट्रोलर्सनी ट्वीट करत प्रकाशराज यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. एका व्यक्तीने तर प्रकाश राज यांना सांगितले की, असे करून तुम्ही कोणत्याही पक्षाचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान करत आहात. दुसरीकडे, दुसरी व्यक्ती म्हणाली, एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणे आणि देशाचा द्वेष करणे यात खूप फरक आहे. तुमची अवस्था पाहून वाईट वाटले. दुसरा ट्रोल म्हणाला, तुम्ही खूप खाली वाकले आहात… देशवासी असल्याची लाज वाटते… मला इस्रोचा अभिमान आहे… जय हिंद.

- Advertisment -