फसवणूक प्रकरणी अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानवर युपीमध्ये गुन्हा दाखल

gauri khan shares instagram post provided 95,000 meals to communities living in poverty
CoronaVirus: गौरी खान पुढे सरसावली, केली ९५ हजार लोकांच्या जेवणाची सोय!

पटना : युपीच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये अभिनेता शाहरूख खानची पत्नी गौरी खान व्यतिरिक्त इतर तीन जणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे निवासी जसवंत शाह यांनी गौरी खान व्यतिरिक्त तुलसियानी ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांची नावे सुद्धा एफआरआयमध्ये लिहीली आहेत. या तिघांवर ८५.४६ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. २०१५ मध्ये गौरी खान मेसर्स तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेटर असल्याचा आरोप जसवंत शहा यांनी केला आहे.

गौरी खान हिने २०१५ मध्ये तुलसियानी कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रचार केला असून तिने सुशांत गोल्फ सिटीमध्ये घरे बनवण्यात येत असल्याची माहिती दिली होती. पिडीत जसवंत शहा यांनी गौरी खानच्या बोलण्यावर विश्वास ठेवून २०१५ कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार आणि संचालक महेश तुलसियानी यांची लखनऊमध्ये जाऊन भेट घेतली होती.

आरोप आहे की या दोघांनी ८६ लाख रुपयात घर देण्याचे जसवंत शहा यांना आश्वासन दिले होते. याशिवाय एक वर्षानंतर घरावर ताबा देण्याचे आश्वासनही दिले होते. या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पिडीत जसवंत शहा यांनी ८५.४६ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. त्यावेळी आरोपींनी सहा महिन्यात घरावर ताबा न मिळाल्यास जमा केलेली रक्कम व्याजासहीत पर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु रक्कम घेतल्यानंतही आरोपींनी घराचा ताबा दिला नाही आणि जसवंत शहा यांच्याकडून नोंदणी करण्यात आलेल्या घराचे कागदपत्र इतर व्यक्तीच्या नावावर करण्यात आले. अशावेळी जसवंत शहा यांनी पैसे परत मागितले तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या जसवंत शहा यांनी युपीच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा – चोरमंडळानंतर चप्पलचोर, कुंडीचोर, चोरबाजार, चोरगट; सामनातून शिंदे गटाचे पुन्हा वाभाडे