राजकारणातली ‘ही’ जोडी माहितीय का तुम्हाला ? भरत दाभोळकरांच्या पोस्टची चर्चा

अशीच चर्चा सध्या राजकारणातल्या जय - वीरूच्या जोडीची रंगते आहे.

सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे किंवा राजकीय नेत्यांचे जुने फोटो दिसले की लगेचच त्याची चर्चा रंगते. अशीच चर्चा सध्या राजकारणातल्या जय – वीरूच्या(jay- veeru) जोडीची रंगते आहे. या जोडीचा सुद्धा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरतो आहे. ही जोडी नेमकी कोणती आहे ? आणि या जोडीची एवढी का होतेय ते जाणून घ्या.

हे ही वाचा – द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ

अभिनेता आणि ऍड गुरु अशी दुहेरी ओळख असलेले. भरत दाभोळकर(bharat dabholkar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात सुद्धा असतात. भरात दाभोळकर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोचीच सध्या सोशल मिडियावर चर्चा रंगते आहे. भरत दाभोळकर यांनी पोस्ट केलेला हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shaha) यांचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा – Modi Govt 3 Years: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण, पुढील…

भरत दाभोळकर(bharat dhabholkar) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत. त्याचबरोबर हा फोटो शेअर करत भरत यांनी एक छान असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. ”गब्बर मुक्त भारत अभियान सुरु करण्यापूर्वीचा, जय – वीरूचा तरुणपणातील फोटो मिळाला” असे कॅप्शन भरत दाभोळकर यांनी त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Dabholkar (@bharatdabholkar)

हे ही वाचा –  इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगनाचा जबरदस्त लूक; ‘इमरजेंसी’चा टीझर रिलीज

भरत दाभोळकर(bharat dabholkar) यांनी आपल्या करियरची सुरुवात फिलिप्स येथून केली होती. त्या नंतर भरत यांनी प्रसीद्ध अश्या अमूल बटरच्या जाहिरातींसाठी दीर्घकाळ काम केले. त्याचबरोबर त्यांनी १५ हून कधिक चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांमध्ये काम करत अभिनेता म्हणून नवीन ओळख मिळालेले भरत दाभोळकर हे मुळात एक ‘जाहिरात तज्ञ’ किंवा ‘ऍड गुरु’ म्ह्णून ओळखले जातात.

हे ही वाचा – शरद पवारांकडून शिवानी बावकरचं विशेष कौतुक, पोस्ट शेअर करत शिवानी म्हणाली…